शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

सेसच्या लाखो रुपयांच्या निधीवर प्रशासनाचाच ‘डल्ला

By admin | Published: August 09, 2016 12:39 AM

’ आश्चर्य : ‘खुर्ची’ वाचविण्यासाठी केली आठ लाखांची रातोरात तरतूद

 नाशिक : एकीकडे जिल्हा परिषदेच्या तुटपुंज्या सेसच्या निधीतून जिल्हा परिषद सदस्यांच्या गटातील आवश्यक कामे होत नसताना, दुसरीकडे आता या सेसच्या निधीवरच प्रशासनाने आपली ‘खुर्ची’ जप्ती टाळण्यासाठी थोडीथोडकी नव्हे तर तब्बल आठ लाखांची तरतूद केल्याचे वृत्त आहे.इगतपुरी तालुक्यातील कावनई येथील एका पाझर तलावाच्या कामासाठी भूसंपादन केलेल्या जमिनीचा सुमारे ६६ लाखांचा मोबदला देणे प्रलंबित असताना संबंधित खासगी ट्रस्टने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या विरोधात येथील न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेचा निकाल याचिकाकर्त्या ट्रस्टच्या बाजूने लागल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या खुर्ची जप्तीचे आदेश काढण्यासाठी विनंती केली आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याबाबत विनंती याचिका दाखल केली आहे. येत्या २४ आॅगस्टपर्यंत नाशिक येथील जिल्हा दिवाणी न्यायालय (वरिष्ठस्तर) येथे भूसंपादनाच्या एकूण रकमेपैकी १० टक्के रक्कम जमा न केल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या खुर्ची जप्तीचे आदेश निघण्याची शक्यता पाहून हादरलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांना तत्काळ या प्रकरणासाठी जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून ७ लाखांची तरतूद करण्याचे आदेश दिल्याचे समजते. त्यानुसार रातोरात प्रशासनाने लेखा विभागाला या प्रकरणासाठी ७ लाखांची तरतूद करण्याचे आदेश बजावले. त्यानुसार जिल्हा मुख्य लेखा अधिकाऱ्यांनी सात लाखांची तरतूद जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून केली. सुमारे साडेसहा लाखांचा धनादेश न्यायालयाच्या नावे जिल्हा परिषदेने भरूनही दिल्याचे कळते. तत्पूर्वी याच प्रकरणासाठी सेसच्या निधीतून १ लाखांची तरतूद करण्यात आली होती, हे विशेष. आगामी निवडणुकांना उणे-पुरे चार सहा महिने बाकी असताना आणि जिल्हा परिषद सदस्य त्यांच्या गटात जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी ‘दिवसरात्र’ एक करीत असतानाच प्रशासनाने जिल्हा परिषद सदस्यांच्या हक्काच्या सेस निधीवर असा ‘रातोरात’ लाखोंचा डल्ला मारल्याने सदस्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)