शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
2
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
5
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
6
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
7
Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
8
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
10
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?
12
कश्मिरा शाहची अपघातानंतर दिसली पहिली झलक, लांबलचक पोस्ट शेअर करत म्हणाली...
13
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
14
"मी यावेळी मतदान करु शकणार नाही...", मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट
15
"पक्षापेक्षा जास्त उमेदवाराचा विचार!" मनवा नाईकने केलं मतदान, म्हणाली, "स्थिर सरकार..."
16
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?
17
६ महिन्यांत 'या' शेअरमध्ये ५६५% ची वाढ; आता बोनस शेअर देण्याची तयारी, कोणता आहे स्टॉक?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
19
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
20
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...

येवला उपजिल्हा रु ग्णालयाच्या बांधकामास शासनाची मंजुरी

By admin | Published: October 25, 2016 11:20 PM

सुविधा : साडेआठ कोटी रु पये खर्चास प्रशासकीय मान्यता

येवला : येथील १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी साडेआठ कोटी रुपयांच्या बांधकामास शासनाने सोमवारी प्रशासकीय मान्यता दिली. शहर व तालुक्याचा विस्तार बघता नागरिकांना येवला येथे चांगल्या वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शहरात ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाची इमारत उपलब्ध करून नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यानंतर शहर व तालुक्यातील नागरिकांना जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या सर्व वैद्यकीय सेवा येवला येथे एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात यासाठी येवला ग्रामीण ्नरुग्णालयाला १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यासाठी पाठपुरावा केला.येवला शहरात उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर याठिकाणी एकूण ६० नवीन पदे निर्माण होणार आहेत. त्यात प्रत्येकी एक सर्जन वैद्यकीय अधिकारी, स्त्री व प्रसूती रोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ, नेत्र शल्य चिकित्सक, दंत चिकित्सक, दोन बधिरीकरण शास्त्रज्ञ, चार वैद्यकीय अधिकारी अपघात, एक मेट्रन, तीन पीएचएन, याबरोबरच २० अधिपरिचारिका यांच्यासह एक आहार तज्ज्ञ, दोन रक्तपेढी तज्ज्ञ, दोन प्रयोगशाळा शास्त्रज्ञ, एक क्ष-किरण विभागतज्ज्ञ, एक इसीजी तंत्रज्ञ इ. विविध ६० नवीन पदांचा समावेश आहे. मागील मोकळ्या भूखंडामध्ये रुग्णांच्या नातेवाइकांना राहण्यासाठी धर्मशाळा, उपाहारगृह तर रुग्णालयाच्या परिसरात बायोमेडिकल वेस्ट इत्यादींचा समावेश असेल. (वार्ताहर)