शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

दरवाढीमागे सरकार नव्हे बिल्डरच

By admin | Published: January 25, 2015 12:15 AM

दरवाढीमागे सरकार नव्हे बिल्डरच

नाशिक - शहरात रेडीरेकनरचे दर वाढल्याची हाकाटी बांधकाम व्यावसायिक पिटत असले तरी हे दर मुळातच कसे वाढले, त्यामागे केवळ सरकारच आहे की बिल्डर व्यावसायिकांचा काळाबाजार याचा विचार केला तर जमिनीचे दर वाढण्यामागे सरकारपेक्षा विकासकच अधिक जबाबदार असल्याचे स्पष्ट होते. सोयी-सोयीने रेडीरेकनर आणि बाजारभावाचा व्यवहार करणाऱ्या विकासकांचीच दरवाढीच्या विरोधात ओरड होत आहे, हे विशेष होय.नाशिकमध्ये गेल्या काही वर्षांत जमिनींचे प्रचंड भाव वाढले आहेत. टु रूम किचन सदनिका घेण्यासाठी लागणारे पाच ते सहा लाख रुपयांमध्ये आता वन रूम किचनही मिळत नाही. चांगल्या वस्तीत सदनिका खरेदी करायची असेल तर हेच दर कमीत कमी ३५ लाख रुपयांच्या पुढे आहेत. अनेक भागांत तर सदनिकांचे दर ६५ लाख रुपयांपासून दोन कोटी रुपयांचे आहेत. ज्यांना परवडेल अशाच व्यक्ती हे खरेदी करीत नसले तरी कल्पनेत नसलेले हे दर कसे वाढले, याचा शोध घेण्याची गरज आहे. रेडीरेकनरचे दर ठरविताना नगररचना विभागाच्या वतीने शहराचे २२ भाग करण्यात आले असून, तेथील सर्वाधिक दराचा झालेला आणि जो मुद्रांक शुल्काच्या दस्त नोंदणीत आहे, अशा व्यवहाराचा आधार घेतला जातो असे सरकारी यंत्रणेचे म्हणणे आहे. विकासकांनादेखील ते मान्य आहे, परंतु एकाच सर्व्हेमध्ये सर्व व्यवहार त्या दराने होत नाही असा त्यांचा दावा आहे. दोन्ही दावे खरे मानले तरी मुळातच सरकारने जो दर ठरविला त्याच्या आसपास त्या विभागात व्यवहार झाला असेल तर तो मान्यच करावा लागेल. मग सरकारचे दरच जेथे कमी होते त्यापेक्षा अधिक दराने व्यवहार कसा झाला, असा प्रश्न निर्माण होतो.याचाच अर्थ बाजारभावापेक्षा अधिक दराने व्यवहार होतच असतात. हा व्यवहाराचाच भाग आहे. मग बाजारात विकासक जे दर ठरवितात त्याच्या कुठे तरी जवळपास सरकारी दर येत असेल तर चूक सरकारची की विकासकांची? जमिनीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होते, ही गुंतवणूक सर्वसामान्य नागरिकांकडून कमी होत, बांधकामातदेखील अतिरिक्तसदनिका घेणे त्यांनाच परवडते ज्यांच्याकडे दोन पैसे जास्त आहेत आणि त्यांना गुंतवणूक करून नंतर लाभ मिळवायचा आहे. त्यातही अधिकारी-राजकारणी, पेशेवर अशा घटकांकडून काळा पैसा गुंतवण्यासाठी सर्वाधिक सुरक्षित क्षेत्र रिअल इस्टेट हेच ठरले आहे. साहजिकच काळा पैसा पांढरा करण्यासाठी ज्या भागात ३५ हजार रुपये दर आहे, त्या भागात अशाप्रकारे काळ्या पैशांची गुंतवणूक करणारे चाळीस ते पंचेचाळीस हजार भावाने गुंतवणूक केल्याचे दाखवतात आणि प्रत्यक्षात दर कमी असतात. असाच व्यवहार नोंदविला गेला की साहजिकच सरकार तेच जमिनीचे दर आहे, असे मान्य करते आणि त्यानुसार पुढील वर्षीचे दर त्यावरच आधारित ठरतात. त्यामुळे पुढील वर्षी त्या नोंदविल्या गेलेल्या दस्तापेक्षा अधिक दर सरकार जाहीर करते. मग यात चूक कोणाची? सरकारची की जमीन किंवा सदनिकेत काळा पैसा गुंतवण्याच्या नादात जास्त दराने खरेदी दाखविणाऱ्या विकासकांची, याचा विचार केला तर अर्थातच विकासकच आहेत, हे स्पष्ट होते. रेडीरेकरनरचे दर वाढविल्याने त्याचा फटका शेवटी घर खरेदी करणाऱ्यांना बसणार हे खरेच आहे, परंतु दरवाढ करण्यामागे केवळ सरकारच जबाबदार आहे, असा जो कांगावा केला जातो तो पूर्णत: चुकीचा आहे. (प्रतिनिधी)