शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

गाळप नियोजनाचा सरकारी ‘घंटा’नाद

By admin | Published: October 01, 2015 10:51 PM

गाळप नियोजनाचा सरकारी ‘घंटा’नाद

  नाशिक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाचा ऊस गाळप हंगाम १५ आॅक्टोबरपासून सुरू करण्याचे नियोजन केलेले असले, तरी प्रत्यक्षात गाळपासाठी लागणारा ऊस तोडणारे कामगारच १५ आॅक्टोबरपर्यंत उपलब्ध होण्याबाबत सांशकता असल्याने सरकारचे ऊस गाळपाचे नियोजन कोलमडणार आहे. बहुतांश कारखान्यांनी १ नोव्हेंबरपर्यंत ऊस गाळप सुरू करण्याची विनंती सरकारकडे करण्याची तयारी केली आहे. त्यातच गाळपासाठी शासनाच्या अटी, स्वाभिमानी संघटनेचा २११७ हमीभावाचा उसाच्या दांड्याचा ‘बुडखा’, कारखान्यांची आर्थिक हतबलता याची जोड नियोजन कोलमडण्यास पुरेशी ठरणार आहे.पावसाने दाखविलेला हात, जोडीला दुष्काळाची साथ, या पार्श्वभूमीवर उसाची कमी क्षेत्रावर झालेली लागवड, ऊसतोड कामगारांना किमान महिन्याआधी द्यावी लागणारी अ‍ॅडव्हॉन्सची रक्कम, तोंडावर आलेली दिवाळी या सर्व पार्श्वभूमीवर १५ आॅक्टोबरपासून ऊस गाळपाचा हंगाम सुरू तरी कसा करणार, असा मोठा प्रश्न साखर कारखानदारांपुढे ‘आ’वासून उभा राहिला आहे.  नाशिकचा विचार करता उसाच्या लागवडीचे सरासरी क्षेत्र हे ३५ ते ३८ हजाराच्या आसपास असताना यावर्षी पूर्वहंगामी, खोडवा व आडसाली उसाचे लागवडीचे सरासरी क्षेत्र १८ हजार ४०० हेक्टरवर मर्यादित राहिले आहे. शिखर बॅँकेच्या आवळलेल्या आर्थिक नाड्या आणि त्यावर आलेली प्रशासकीय राजवट पाहता, यंदाच्या हंगामात जिल्हा बॅँकांनी तोट्यातील आणि अडचणीतील साखर कारखान्यांना कर्ज देण्यास दाखविलेला नकारघंटा, त्यामुळे बंद पडलेले साखर कारखाने आणि उसाचे घटलेले क्षेत्र या अनेक अडचणींचा सामना करून साखर कारखान्यांना १५ आॅक्टोबर हा ऊस गाळपाचा मुहूर्त गाठणे त्यामुळेच अशक्यप्राय झाले आहे. मुळातच आधीच गाळपाच्या नियोजनाबाबत कालमर्यादा ठरविणे म्हणजे सर्व काही आलबेल असल्याच्या भरवशावर केलेले नियोजन म्हटले, तर सरासरी ५० टक्क्यांपेक्षा कमी राहिलेली पर्जन्यमानाची सरासरी आणि २११७ रुपये उसाला हमीभाव देण्याची सक्ती, त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उचललेला दंडुका पाहता ऊस उत्पादकच नव्हे, तर साखर कारखान्यांनाही १५ आॅक्टोबरचा गाळपाचा मुहूर्त न पेलवणारा आहे. याउलट साखर कारखान्यांनी १ नोव्हेंबरच्या पुढे गाळप सुरू करण्याची केलेली विनंतीच सरकारी नियोजनाला खो देणारी ठरली आहे.