शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

विलंब सरकारचा, उद्योजकांना मात्र नोटिसा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 1:14 AM

सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतील प्लेटिंग आणि अन्य तत्सम उद्योगांचा रासायनिक सांडपाणी प्रकल्प म्हणजेच सीईटीपीचा प्रश्न सध्या पर्यावरण खात्याकडे प्रलंबित असताना प्रदूषण नियंत्रण मंडळाने मात्र उद्योजकांनाच याचा जाब विचारला असून, सुमारे तीस कंपन्यांना नोटिसा बजावल्या आहेत.

नाशिक : सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतील प्लेटिंग आणि अन्य तत्सम उद्योगांचा रासायनिक सांडपाणी प्रकल्प म्हणजेच सीईटीपीचा प्रश्न सध्या पर्यावरण खात्याकडे प्रलंबित असताना प्रदूषण नियंत्रण मंडळाने मात्र उद्योजकांनाच याचा जाब विचारला असून, सुमारे तीस कंपन्यांना नोटिसा बजावल्या आहेत.  या प्रकारामुळे उद्योजकही बुचकळ्यात पडले असून त्यांना काय उत्तर द्यावे, असा प्रश्न पडला आहे. विशेष म्हणजे मंडळाच्या स्थानिक अधिकाऱ्यांना हा सर्व प्रकार ज्ञात असताना मुंबई कार्यालयाने नोटिसा बजावल्या असून, परवाने का रद्द करू नये, अशी विचारणा केली आहे.  नाशिक शहरातील सातपूर आणि अंबड औद्यागिक वसाहतीत असलेल्या प्लेटिंग उद्योगांना या उद्योगातून बाहेर पडणाºया रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. तथापि, अनेक वर्षे या विषयाला गती मिळालेली नव्हती. व्यक्तिगत पातळीवर हा प्रकल्प व्यक्तिगत नसल्याने सामूहिकस्तरावर हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आल्या. त्यासाठी ज्येष्ठ उद्योजक शरद कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला आणि त्यानुसार औद्योगिक विकास महामंडळाकडून २०१४ मध्ये भूखंड मिळवला.  अंबड औद्योगिक वसाहतीतील ८ हजार ९०० चौरस मीटर क्षेत्राचा भूखंड मेटल फिनिशर्स असोसिएशनने मिळवला असून, त्यानंतर शासनाच्या मदतीने हा प्रकल्प सादर करण्यासाठी नाशिक सीईटीपी फाउंडेशनदेखील साकारली आहे. त्यांच्यामार्फत तयार करण्यात आलेला प्रकल्प अहवाल फेबु्रवारी २०१७ मध्ये शासनाला सादर केला. त्यानंतर हा अहवाल ना हरकत दाखल्यासाठी शासनाच्या पर्यावरण खात्याकडे सादर करण्यात आला असून, त्याला अद्याप मान्यता मिळालेली नाही.  ही सर्व वस्तुस्थिती माहिती असताना महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहसंचालकांनी नाशिकमधील सुमारे तीस  उद्योगांना नोटिसा बजावल्या असून, चार दिवसांत खुलासा करण्याची मुदत दिली आहे. विहित मुदतीत खुलासा न केल्यास संबंधितांवर परवाने रद्द करण्याची कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. या प्रकारामुळे  संबंधित उद्योजक बुचकळ्यात पडले आहेत.११ कोटींचा प्रकल्पसामूहिक सांडपाणी प्रकल्प उभारणीच्या डीपीआरनुसार हा प्रकल्प ११ कोटी रु पयांचा असून, त्यात केंद्र सरकारकडून सव्वादोन कोटी रु पये, एमआयडीसीकडून सव्वादोन कोटी रु पये आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ५५ लाख रु पये असे साधारण ५ कोटी मिळणार असून, उर्वरित निधी एसपीव्हीला उभारावा लागणार आहेत. मेटल फिनिशर्स असोसिएशनचे जवळपास १२७ सभासद असून, सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी संस्थेकडे जमा झालेला आहे.सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतील प्लेटिंग उद्योग आणि पावडर कोटिंग करणाºया १४० उद्योगातून दररोज दोन लाख लिटर दूषित पाणी बाहेर पडत आहे. म्हणून पहिल्या टप्प्यात या प्रकल्पाच्या माध्यमातून दररोज ५ लाख लिटर दूषित पाण्यावर प्रक्रि या करण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार दुसºया टप्प्यात पुन्हा ५ लाख लिटर दूषित पाण्याची क्षमता वाढविण्यात येणार आहे.

टॅग्स :MIDCएमआयडीसी