नाशिक : महापालिकेच्या रुग्णालयात सेवारत असतानाही खासगीरीत्या दवाखाने चालविणाºया डॉक्टरांवर कडक कारवाईची मागणी स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी केल्यानंतर सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी त्याबाबतचा चौकशी अहवाल तातडीने देण्याचे आदेश वैद्यकीय अधीक्षकांना दिले.स्थायी समितीच्या बैठकीत मुशीर सय्यद यांनी नाशिकरोडच्या बिटको रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. जयंत फुलकर हे सेवेत असतानाही खासगी दवाखाना चालवित असल्याचा आरोप केला. या आरोपादाखल त्यांनी रुग्णतपासणीचे काही पुरावेही सभागृहाला सादर केले. शासकीय सेवेत असताना डॉक्टरांना खासगी प्रॅक्टीस करता येत नाही, असा नियम असतानाही डॉ. फुलकर हे नियमभंग करत आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीतही काहीच सुधारणा नाही. त्यामुळे डॉ. फुलकर यांची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी आणि फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मुशीर सय्यद यांनी केली. सीमा ताजणे यांनीही बिटको रुग्णालयातील भोंगळ कारभाराकडे सभागृहाचे लक्ष वेधले आणि वैद्यकीय अधिकाºयाबद्दल तक्रार केली. त्यावर सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी सदर डॉक्टरची चौकशी करण्याबरोबरच अन्य डॉक्टरही खासगी प्रॅक्टीस करत असल्यास त्याबाबतचा अहवाल पुढच्या सभेत सादर करण्याचे आदेश दिले.
खासगी व्यवसाय करणाºया मनपातील डॉक्टरांची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 3:16 PM