नाशिक : देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकºयाचे प्रश्न सोडविण्याऐवजी कर्जमाफीसाठी त्याला पत्नीसह बॅँकेच्या रांगेत उभे केले, सरसकट कर्जमाफी तर दिली नाहीच उलट कर्जवसुलीसाठी त्याची भांडीकुंडी घराबाहेर काढून समाजात बेअब्रू केली. त्यामुळे शेतकºयांप्रति नीती व नियतीत फरक असलेल्या सरकारला आता सत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही, अशा शब्दात राष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सरकारवर हल्ला चढविला. शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, महिला व तरुणांवर अन्याय करणारे हे सरकार घालविल्याशिवाय राष्टÑवादी कॉँग्रेस यापुढे स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. राष्टÑवादी कॉँग्रेसच्या उत्तर महाराष्टÑातील हल्लाबोल यात्रेचा समारोप गोल्फ क्लब मैदानावरील जाहीर सभेने करण्यात आला त्यावेळी शरद पवार बोलत होते. व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड आदी नेते उपस्थित होते. शेतकरी, तरुण, आदिवासी, महिलांच्या प्रश्नावर राष्टÑवादी कॉँग्रेसने महाराष्टÑाच्या कानाकोपºयातून हल्लाबोल यात्रा काढून चांगले वातावरण निर्माण केले असून, यात्रेच्या निमित्ताने महाराष्टÑातील जनतेच्या या आवाजाकडे देशातील कोणत्याही सत्ताधाºयांना दुर्लक्ष करून चालणार नाही, त्यासाठी नाशिकची सभा महत्त्वाची असल्याचे पवार यांनी प्रारंभीच सांगितले. देशातील व राज्यातील राज्यकर्ते मोठे गमतीदार आहेत, त्यांच्या मोठमोठ्या घोषणा पाहता त्यांचा हात कोणी धरू शकणार नाही, असे सांगून पवार यांनी, राज्याचे व देशाचे प्रमुख ज्या मुक्तपणाने बोलतात ते पाहता जनतेच्या पदरात मात्र काहीच पडत नाही. त्यामुळे ११६ कोटी जनतेच्या भुकेचा प्रश्न सोडविण्याची मनगटात ताकद ठेवणाºया शेतकºयाच्या आजच्या परिस्थितीला हेच सरकार जबाबदार असल्याचा आरोपही केला. केंद्र सरकारने देशात दरवर्षी १२ हजार शेतकरी आत्महत्या करतात, असे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रावर लिहून दिले. त्यापेक्षाही अधिक शेतकरी आत्महत्या करीत असून, हे होण्यामागे शेतकºयांच्या प्रश्नांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच सरकारकडे नसल्याचे ते म्हणाले. धुळे येथील धर्मा पाटील यांच्या आत्महत्येचा संदर्भ देत पवार यांनी, धर्मा पाटील हे एक प्रकरण असले तरी, देशात व राज्यात असे अनेक धर्मा पाटील आहेत, ज्यांना हे सरकार न्याय देऊ शकत नाही. धर्मा पाटील यांच्या पत्नीने तर सरकार न्याय देणार नसेल तर आम्हीही त्याच मार्गाने जाऊ, असे जाहीर केले आहे. त्यामुळे बळीराजाला आत्महत्या करण्याची वेळ आणणाºया सत्ताधाºयांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असे सांगितले. शेतकºयांना आत्महत्येच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्याची मानसिकता दिल्लीच्या सरकारमध्ये नाही. शेतकºयांना कर्जमाफी देण्यास दिल्ली तयार नाही, तर राज्यातील शेतकºयांचे शंभर टक्के कर्ज माफ करण्याची धमक मुख्यमंत्र्यांमध्ये नाही. उलट ज्या शेतकºयांनी, शिक्षकांनी, सोसायटीच्या खातेदाराने जिल्हा बॅँकेमध्ये नोटाबंदीच्या काळात पैसे भरले त्यांच्या नोटा बदलून द्यायलाही केंद्र सरकार तयार नाही. त्यामुळे सामान्य माणसांप्रती या सरकारची नीती व नियत साफ नसल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले असून, साडेतीन वर्षे जनतेने हे सारे सहन केले, आता बस्स झाले. शेतकरी, तरुणांना जीवनात परिवर्तन हवे असेल, आदिवासी समाजाला सन्मानाने जगायचे असेल, महिलांना न्याय हवा असेल तर संधी मिळेल त्यावेळी या सरकारला खड्यासारखे बाजूला सारा, असे आवाहनही शेवटी पवार यांनी केले.फसव्या सरकारच्या विरोधात ‘हल्लाबोल’: तटकरेप्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी, सत्तेवर येण्यापूर्वी शेतमालाला हमीभाव, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी अशा आश्वासनांची खैरात करणाºया आणि सत्तेवर आल्यानंतर सोयिस्कररीत्या विसरणाºया फसव्या सरकारच्या विरोधात हा हल्लाबोल असल्याचे सांगितले. नार-पार योजनेचे पाणी गुजरातला देण्याचा घाट सरकारने घातला असून, शेतकºयांना सरसकट कर्जमाफी, गुजरातला पाणी देण्याचा निर्णय रद्द, पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोºयात आणल्याशिवाय राष्टÑवादी कॉँग्रेस स्वस्थ बसणार नाही, अशी घोषणाही तटकरे यांनी केली....मग शेतकरी आत्महत्या का करतात : मुंडेयावेळी बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठविली. दोन वर्षांपूर्वी राज्याचा अर्थसंकल्प शेतकºयांना समर्पित असे म्हटले होते तर यंदाचा अर्थसंकल्पही शेतकºयांसाठीच असल्याचे जाहीर केले. राज्यात जलयुक्त शिवार योजनेने शेतशिवार फुलले, पाण्याची साठवण झाली असे आकडेवारीनिशी सरकार दावे करीत असेल तर मग राज्यातील शेतकरी आत्महत्या का करतात, असा सवाल केला. ज्या ज्या वेळी राज्य सरकार अडचणीत आले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव पुढे करते. कर्जमाफीसाठीही शिवाजी महाराजांचे नाव वापरले, परंतु प्रत्यक्षात शेतकºयांच्या पदरात काहीच पडले नाही त्यामुळे या सरकारने शिवाजी महाराज व शेतकºयांचा अवमानच केल्याचा आरोपही मुंडे यांनी केला.मराठी शाळा बंद करू देणार नाही : सुळेखासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातील १३०० मराठी शाळा बंद करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, शाळेत एक मूल जरी असले तरी, शाळा चालली पाहिजे, असे राष्टÑवादी कॉँग्रेसचे मत असून, पुणे जिल्हा परिषदेत राष्टÑवादीची सत्ता असल्याने प्रसंगी खिशातून पैसे घालू पण पुणे जिल्ह्णातील एकही जिल्हा परिषदेची शाळा बंद करणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील एकही मराठी शाळा बंद करू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.शेतकºयांना कृषिमंत्रीच माहिती नाहीत : पटेलदेशात सद्यस्थितीतील केंद्रीय कृषिमंत्र्यांचे नावही शेतकºयांना माहिती नसून शेतकºयांना अक्षरश: राधे-राधे म्हणण्याची वेळ आणली आहे, अशी टीका ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी केली. सत्तेवर येण्यापूर्वी आठ कोटी रोजगार, अच्छे दिनची घोषणा सरकारने केली पण त्यापैकी काहीच पदरात पडले नाही त्यामुळे चार वर्षांत सरकारने केलेल्या कामाचा हिशेब मागण्याची संधी या राष्ट्रवादीच्या काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोलमुळे मिळाली आहे़ गुजरात, राजस्थान या ठिकाणी भाजपाचा झालेला पराभव पाहता परिवर्तनाची वेळ आली असल्याचेही ते म्हणाले.सरकारच्या नियतीबाबत शंका : आव्हाडयावेळी बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, शेतीच्या लागवडीखालील क्षेत्रामध्ये चाळीस टक्के घट, २०० हून अधिक शेतकºयांच्या आत्महत्या, जीएसटी, नोटबंदी या निर्णयामुळे सावकाराच्या दारात शेतकरी पोहोचलेला, असे विदारक चित्र भाजप-शिवसेना सरकारच्या काळात निर्माण झाल्याची टीका केली. राज्यात १ लाख ७७ हजार जागा रिक्त असतानाही सरकारने नोकर भरतीबंदी धोरण अवलंबून बेरोजगार तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाºयांच्या स्वप्नांवर पाणी फेरल्याचा आरोप केला. प्रारंभी शरद पवार व इतर नेत्यांच्या हस्ते व्यासपीठावरील राष्टÑपुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन आमदार हेमंत टकले यांनी केले. राष्टÑवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, आमदार जयंत जाधव, रवींद्र पगार यांचीही भाषणे झाली. व्यासपीठावर पक्षाचे नेते अरुणभाई गुजराथी, नवाब मलिक, अनिल देशमुख, राजेश टोपे, विद्या चव्हाण, गुलाबराव देवकर, आमदार नरहरी झिरवाळ, पंकज भुजबळ, बापू भुजबळ, माजी खासदार माधवराव पाटील, विनायकदादा पाटील, तुकाराम दिघोळे, देवीदास पिंगळे, माणिक शिंदे, शांताराम तात्या आहेर, दिलीप बनकर, श्रीराम शेटे, अर्जुन टिळे, विष्णुपंत म्हैसधुणे, जयश्री पवार, डॉ. भारती पवार, विजयश्री चुंभळे, अनिता भामरे, प्रेरणा बलकवडे, विश्वास ठाकूर, संजय खैरनार, संतोष सोनपसारे आदी उपस्थित होते.
सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही शरद पवार : उत्तर महाराष्टÑातील हल्लाबोल यात्रेचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 1:35 AM
नाशिक : देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकºयाचे प्रश्न सोडविण्याऐवजी कर्जमाफीसाठी त्याला पत्नीसह बॅँकेच्या रांगेत उभे केले, सरसकट कर्जमाफी तर दिली नाहीच उलट कर्जवसुलीसाठी त्याची भांडीकुंडी घराबाहेर काढून समाजात बेअब्रू केली.
ठळक मुद्देशेतकरी, शेतमजूर, आदिवासी, महिला व तरुणांवर अन्याय करणारे सरकारमहाराष्टÑातील हल्लाबोल यात्रेचा समारोप शेतकºयाच्या आजच्या परिस्थितीला हेच सरकार जबाबदार