नाशिक - सन २०१६ मध्ये चार तर सन २०१७ मध्ये तीन रविवारी सार्वजनिक सुट्टयांवर सरकारी कर्मचाऱ्याना पाणी सोडावे लागले होते. पुढील वर्षी २०१८ मध्ये केवळ दोनच रविवार वाया जाणार असल्याने सरकारी कर्मचाऱ्यासाठी ही खुशखबर आहे. याशिवाय, वर्षातून तीन वेळा सलग सुट्टयांची पर्वणी अनुभवण्यास मिळणार असून सन २०१८ मध्ये एकूण २२ सार्वजनिक सुट्टयांचा लाभ सरकारी कर्मचाऱ्यासह विद्यार्थी वर्गाला होणार आहे.शासनाच्यावतीने सन २०१८ मध्ये होणाऱ्या सार्वजनिक सुट्टयांचे वेळापत्रक नुकतेच जारी करण्यात आले आहे. त्यात प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी-शुक्रवार), महाशिवरात्री (१३ फेबु्रवारी-मंगळवार), छत्रपती शिवाजी महाराज जयंती (१९ फेब्रुवारी-सोमवार), होळी (२ मार्च-शुक्रवार), महावीर जयंती (२९ मार्च-गुरुवार), गुडफ्रायडे (३० मार्च-शुक्रवार), डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (१४ एप्रिल-शनिवार), बुद्ध पौर्णिमा (३० एप्रिल-सोमवार), महाराष्ट दिन (१ मे-मंगळवार), रमजान ईद (१६ जून-शनिवार), स्वातंत्र्यदिन (१५ आॅगस्ट-बुधवार), पारशी नव वर्ष दिन (१७ आॅगस्ट-शुक्रवार), बकरी ईद (२२ आॅगस्ट-बुधवार), गणेशचतुर्थी (१३ सप्टेंबर-गुरुवार), मोहरम (२० सप्टेंबर-गुरुवार), महात्मा गांधी जयंती (२ आॅक्टोबर-मंगळवार), दसरा (१८ आॅक्टोबर-गुरुवार), दिवाळी लक्ष्मीपूजन (७ नोव्हेंबर-बुधवार), दिवाळी बलीप्रतिपदा (८ नोव्हेंबर- गुरुवार), ईद-ए-मिलाद (२१ नोव्हेंबर-बुधवार), गुरुनानक जयंती (२३ नोव्हेंबर-शुक्रवार) आणि ख्रिसमस (२५ डिसेंबर- मंगळवार) अशा एकूण २२ सुट्टयांचा समावेश आहे. पुढील वर्षी गुढीपाडवा (१८ मार्च) आणि रामनवमी (२५ मार्च) या दोनच सुट्या रविवारी आल्या आहेत. सन २०१६ मध्ये चार रविवार तर चालू वर्षी तीन रविवारी सार्वजनिक सुट्टया आल्या होत्या. मात्र, पुढील वर्षी दोनच रविवार वाया जाणार आहेत. डॉ. आंबेडकर जयंती शनिवारी आली असून याच दिवशी दुसरा शनिवार असल्याने ही सुटीही वाया जाणार आहे. पुढील वर्षी सलग तीन दिवस सुट्टयांची पर्वणी तीनदा अनुभवता येणार आहे. २६ जानेवारीला शुक्रवार असून २७ जानेवारीला चौथा शनिवार आणि २८ जानेवारीला रविवार अशी तीन दिवस सलग सुटी अनुभवता येईल. तर १८ फेबु्वारीला रविवार तर १९ फेबु्रवारीला शिवजयंती आहे तसेच २९ एप्रिलला रविवार, ३० एप्रिलला बुद्ध पौर्णिमा आणि १ मे रोजी महाराष्टÑ दिन अशी तीन दिवस सुट्टयांची मौज आहे. २३ नोव्हेंबरला शुक्रवारी गुरुनानक जयंतीची सुट्टी असून २४ नोव्हेंबरला चौथा शनिवार आणि २५ नोव्हेंबरला रविवारची सुटी असा तीन दिवस सलग सुट्यांचा योग आहे.भाऊबीजेला अतिरिक्त सुट्टीसन २०१६ मध्ये महाराष्ट दिन, महात्मा गांधी जयंती, दिवाळी लक्ष्मीपूजन आणि ख्रिसमस या चार सुट्टया रविवारी आल्या होत्या तर सन २०१७ मध्ये शिवजयंती, महावीर जयंती आणि मोहरम या तीन सुट्टया रविवारी आल्या. त्यामुळे रविवारच्या हक्काच्या सुट्टयांवर पाणी फेरले होते. पुढील वर्षी मात्र गुढीपाडवा आणि रामनवमी या दोनच सुट्टया रविवारी आल्या आहेत. त्यामुळे केवळ दोनच हक्काचे रविवार जाणार आहेत. पुढील वर्षी ९ नोव्हेंबरला भाऊबीजेला अतिरिक्त सुट्टी मिळणार आहे.
सरकारी कर्मचाऱ्याना खुशखबर, पुढील वर्षी दोनच रविवार जाणार वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 4:07 PM
सन २०१८ मध्ये मिळणार तीन वेळा तीन सलग सुट्टयांची पर्वणी
ठळक मुद्देशासनाच्यावतीने सन २०१८ मध्ये होणाऱ्या सार्वजनिक सुट्टयांचे वेळापत्रक नुकतेच जारीपुढील वर्षी गुढीपाडवा आणि रामनवमी या दोनच सुट्टया रविवारी आल्या आहेत