नाशिक : राज्यातील १९ लाख सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाºयांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आॅगस्ट महिन्यात सलग तीन दिवस संपावर जाण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे पुढील महिन्यातील दुसºया आठवड्यात ७, ८ व ९ आॅगस्टला सलग तीन दिवस नाशिकसह राज्यातील सरकारी कार्यालयांसह शाळांमध्येही शुकशुकाट होणार आहे. महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वात सर्व सरकारी कर्मचाºयांनी सातवा वेतन आयोग लागू करावा, अंशदान पेन्शन योजना रद्द करावी, १ जानेवारी २०१८ पासूनचा महागाईभत्ता मागील दोन भत्त्यांच्या १४ महिन्यांच्या थकबाकीसह तत्काळ मंजूर करावा, निवृत्तीचे वय ६० वर्षे करावे, रिक्त पदांवर भरती करावी आदी २४ मागण्या दीर्घकाळ प्रलंबित राहिल्याने संपाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे आॅगस्टमधील दुसºया आठवड्यात ७ ते ९ आॅगस्ट असे सलग तीन दिवस संप पुकारल्यामुळे शाळांसह शासकीय कार्यालयांमध्येही कामकाज ठप्प पाडून मागण्या पोहोचविण्याच्या निर्धार राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने केला असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष दिलीप थेटे, कार्याध्यक्ष महेश आव्हाड, सुनंदा जरांडे यांनी दिली आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांचा आॅगस्टमध्ये संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 12:21 AM