नाशिक : राज्य सरकारी कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी शनिवारी राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकाºयांना निवेदनही देण्यात आले. यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घंटानाद करून शासनाविरोधात घोषणाबाजी केली. जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने ३१ आॅक्टोबर २००५ रोजी हक्काची जुनी पेन्शन योजना बंद करून अंशदायी पेन्शन योजना लागू केली आहे. त्याच प्रमाणे २३ आॅक्टोबर २०१७ रोजी वरिष्ठ वेतनश्रेणी बाबत अन्यायकारक निर्णय घेतला आहे. या आंदोलनात अध्यक्ष सचिन वडजे, प्रवीण गायकवाड, गौरव देवढे, योगेश मकोने, सौरभ अहिरराव, किरण शिंदे, नीलेश नहिरे, माणिक घुमरे, कल्पेश चव्हाण, भागवत धूम, राहुल गांगुर्डे, सचिन सूर्यवंशी, केशव देवरे, प्रदीप पेखळे, हरिश्चंद्र भोये सहभागी झाले होते.
पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे घंटानाद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2018 12:47 AM