शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

ग्रामपंचायतीची विहीर विकून शासनाची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 1:32 AM

देवळा तालुक्यातील खालप ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्यासाठी खासगी विहीर खरेदी करून त्यावर शासनाच्या निधीतून मोठा खर्च केला व नंतर तीच विहीर पुन्हा मूळ मालकाला विक्री करून शासनाची दिशाभूल व फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व शासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.

नाशिक : देवळा तालुक्यातील खालप ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्यासाठी खासगी विहीर खरेदी करून त्यावर शासनाच्या निधीतून मोठा खर्च केला व नंतर तीच विहीर पुन्हा मूळ मालकाला विक्री करून शासनाची दिशाभूल व फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व शासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.  नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी २०११ मध्ये तत्कालीन ग्रामपंचायतीच्या पदाधिकाºयांनी लोहोणेर शिवारातील गट नंबर ८९  मधील लक्ष्मणराव देशमुख यांची  पडीक विहीर त्यांच्या पाण्याचा हक्क  राखून ठेवत ५० हजार रुपयांत खरेदी  केली होती. मात्र यासाठी जिल्हा  परिषदेची कोणतीही अनुमती घेण्यात आली नव्हती.सदर विहिरीसाठी शासनाचा स्थानिक विकास निधी तसेच १३व्या वित्त आयोगातून खोदकाम, बांधकाम, पाइपलाइन, मोटार यावर मोठा खर्च केला गेला. विहीर खरेदी करून विहिरीवर खर्च केल्यानंतर २०१६ मध्ये ग्रामपंचायतीने ग्रामसभेत ऐनवेळीच्या विषयात सदरची खरेदी केलेली विहीर पुन्हा मूळ जागा मालकास विक्री करण्याचा ठराव केला. मूळ मालकाने विहीर त्यालाच द्यावी याबाबत मागणी ग्रामपंचायतीकडे केलेली नसताना तसेच सदरचा विषय ग्रामसभेच्या मूळ विषयात घेणे आवश्यक असताना नियमबाह्य पद्धतीने ठराव घेण्यात आला.या विहिरीवर स्थानिक ७ लक्ष ३८ हजार ९५५ इतका खर्च करण्यात आला. मात्र सदरची विहीर केवळ ३ लक्ष ४१ हजार रुपयांना विकण्यात आली. यातून ग्रामपंचायतीचे चार लाख रुपयांचे नुकसान झाले.सदर प्रकरणाच्या तक्रारीनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्याकडे सुनावणी झाली. त्याचा अहवाल आयुक्तां-कडे सादर केला होता. चौकशीतील दोषी व्यक्तींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदWaterपाणी