पेठ - तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानासाठी धान्य पुरवठा करणारा ट्रकपलटी झाल्याने वाहनातील धान्य पावसात भिजले असून ट्रकचेही मोठे नुकसान झाले आहे. पेठच्या शासकिय गोदामातून स्वस्त धान्य दुकानांना शासकिय धान्य पोहच करणारा ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला. पर्यायी व्यवस्था करूनही पावसामुळे ओला झालेला मालच दुकानदारांकडे पोहचिवण्यात आल्याने ग्राहकांना ओला झालेला धान्यसाठा खरेदी करण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील उंबरपाडा , भाटविहीरा , कापूर्णे या गावांसाठी जाणारा सप्टेंबर महिन्याचे धान्य घेऊन जाणारा ट्रक खराब रस्त्यामुळे पलटी झाला .पूर्णपणे उलटा झालेले ट्रकमधील धान्य पावसाचे पाण्याने भिजले मात्र दुसऱ्या वाहनाने तोच माल स्वस्त धान्य दुकानात पोहचवण्यात आला असल्याने लाभार्थ्यास पोहच करण्यात आला. या अपघातात कोणत्याही प्रकारची जिवित हानी झाली नसली तरीही वाहनाचे नुकसान झाले आहे.
शासकिय धान्य वाहतुक करणारा ट्रक पलटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2018 2:48 PM