नाशिक : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती ओढवलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना शासन निर्णयाप्रमाणे दुष्काळी मदत करण्यासाठी किती निधीची आवश्यकता लागेल याबाबत येत्या पंधरा दिवसांत माहिती सादर करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी जिल्हाधिकाºयांना दिले. जिल्ह्णातील आठ तालुके व सतरा मंडळ कार्यालयातील एकूण शेतकºयांचा विचार करता सुमारे तीनशे कोटी रुपयांची आवश्यकता भासण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.मंगळवारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईतून व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे जिल्हाधिकाºयांशी संपर्क साधून जिल्ह्णातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी जिल्ह्णातील टंचाईग्रस्त गावे, टॅँकरद्वारे होत असलेला पाणीपुरवठा, संभाव्य टंचाईची स्थिती, टॅँकरऐवजी पाणीपुरवठ्यासाठी पर्यायी व्यवस्था, तात्पुरत्या नळपाणीपुरवठा योजनांची स्थिती याबाबत माहिती जाणून घेतली. त्यात प्रामुख्याने टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याऐवजी तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजना घेण्यात याव्यात, असा आग्रह धरला. त्यासाठी टंचाई कृती आराखड्यातून निधीची तरतूद करण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा व प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची दुरुस्तीवर भर देण्यात याव्यात व ज्या नळ पाणीपुरवठा योजनांचे वीज बिल थकले असेल त्यातील पाच टक्के बिल टंचाई निधीतून भरून वीजपुरवठा पूर्ववत करण्याच्या सूचना केल्या. यावेळी मंत्र्यांनी चाºयाची परिस्थितीही जाणून घेतली. जिल्ह्यातील पशुधनाची संख्या व त्यातुलनेत लागणारा चारा याची माहिती जाणून घेताना उपलब्ध चारा व अन्य मार्गाने चाºयाची होणारी उपलब्धता कशी करणार याबाबत विचारणा केली. गाळपेºयावर झालेली चाºयाची लागवड, केंद्रीय वैरण विकास कार्यक्रम, कृषी खात्याचा चारा विकास कार्यक्रमाची माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या. वीजपुरवठा बाबतही यावेळी माहिती जाणून घेण्यात आली. दोन हेक्टरपर्यंत मदत दुष्काळी तालुक्यातील शेतकºयांना आर्थिक मदत देण्याबाबत शासनाने दोन वर्षांपूर्वी जााहीर केलेल्या मदतीच्या धर्तीवर आर्थिक मदत देण्याबाबत चाचपणी करण्यात आली असून, त्याबाबतची माहितीही गोळा करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. जिरायती जमिनीसाठी ६८०० व बागायतीसाठी १३,५०० रुपये प्रती हेक्टरी दोन हेक्टर क्षेत्रापुरता मर्यादित मदत यापूर्वी देण्यात आली, तर फळबागांसाठी १८,००० रुपये प्रती हेक्टरी देण्यात आली आहे. जिल्ह्णातील आठ तालुके व सतरा मंडळ कार्यालयातील शेतकºयांना या दुष्काळी मदतीसाठी ग्राह्ण धरण्यात येणार आहे.
दुष्काळी मदतीची आकडेवारी शासनाने मागविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 12:56 AM
नाशिक : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती ओढवलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना शासन निर्णयाप्रमाणे दुष्काळी मदत करण्यासाठी किती निधीची आवश्यकता लागेल याबाबत येत्या पंधरा दिवसांत माहिती सादर करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी जिल्हाधिकाºयांना दिले. जिल्ह्णातील आठ तालुके व सतरा मंडळ कार्यालयातील एकूण शेतकºयांचा विचार करता सुमारे तीनशे कोटी रुपयांची आवश्यकता भासण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ठळक मुद्देतीनशे कोटींची अपेक्षा : दुष्काळी परिस्थितीचा आढावा