मुल्हेर (अलियाबाद) : बागलाण तालुक्यातील साल्हेर-मुल्हेर परीसर हा आदिवासी व अतिदुर्गम म्हणून परीचीत असुन ह्या अनुषंगाने येथील आदिवासी बांधवांनचे जीवनमान उंचावे व त्यांचा शहरी जीवनाशी संपर्क राहावा यासाठी महाराष्ट्र शासनाने खास बाब म्हणून नवसंजीवनी योजना सुरू केली असून त्यांच्या जिवनात परिवर्तन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.ह्यात प्रामुख्याने रस्ते विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. परंतु आज परिसरात अनेक ठिकाणी रस्ताची छोटी मोठी कोट्यवधींची काम होत असली तरी मात्र पुढे पाठ, मागे सपाट असे म्हणण्याची वेळ येऊन ठेपली आहे. हे केवळ आचारसंहीतेच्या व लोकप्रतिनिधींच्या उदासिनतेमुळे होत असल्याची तक्र ार केली जात आहे.हा प्रकार नुकताच बुधवारी घडला. मुल्हेर येथे बाजार असल्याने आठवडे बाजारासाठी परीसरातील अनेक आदिवासी बांधव येत असतात.पंरतू संबंधीत ठेकेदाराने किंवा संबंधीत विभागाने योग्य न काळजी न घेतल्याने सहाजिकच येथील गावातील लोकांनी ह्या नालीचा त्रास झाल्याने अनेक लोक येथे जखमी झाल्याने शेवटी ही नाली बुजवण्याची पाळी येऊन ठेवली. व अखेर नाली जमीनदोस्त करण्यात आली.वास्तविक पहाता संम्बधीत विभागाने ह्या कामी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. अनेक ठिकाणी कामे सुरू त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची वाळू वापरली ती वाळू कोठून आणली जाते.हे शोधणे गरजेचे आहे.ह्या सर्व कामांची गुणनियंत्रण विभागामार्फत चौकशी करणे गरजेचे आहे.