शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

सरकारने निवडणुकीच्या तोंडावर सर्व जिल्हाधिकाऱ्यांना जुंपले कामाला; केलेल्या कामांचीच हवी आहे माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 12:48 AM

नाशिक : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार वर्षांपूर्वीच्या आघाडी सरकारच्या कामगिरीच्या तुलनेत युती सरकारची ठळक कामगिरी जनतेसमोर मांडता यावी यासाठी राज्य सरकारने अभ्यासाला सुरुवात केली आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्णातून शासनाच्या विविध योजनांच्या प्रगतीचा अहवाल मागवत आघाडी सरकारच्या काळातील कामगिरी व गेल्या चार वर्षांतील कामगिरीची तुलनात्मक आकडेवारी ८० प्रश्नसंचामध्ये भरून देण्याच्या सूचना असून, त्या आधारे सरकार आपली प्रतिमा उजळ करणार आहे.

ठळक मुद्देप्रतिमा उजळण्याचा प्रयत्न : आघाडी व युतीच्या कामगिरीतील फरक घेणार जाणून

श्याम बागुल ।नाशिक : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार वर्षांपूर्वीच्या आघाडी सरकारच्या कामगिरीच्या तुलनेत युती सरकारची ठळक कामगिरी जनतेसमोर मांडता यावी यासाठी राज्य सरकारने अभ्यासाला सुरुवात केली आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्णातून शासनाच्या विविध योजनांच्या प्रगतीचा अहवाल मागवत आघाडी सरकारच्या काळातील कामगिरी व गेल्या चार वर्षांतील कामगिरीची तुलनात्मक आकडेवारी ८० प्रश्नसंचामध्ये भरून देण्याच्या सूचना असून, त्या आधारे सरकार आपली प्रतिमा उजळ करणार आहे.साडेचार वर्षांपूर्वी सत्तेत आलेल्या सरकारने काहीच कामगिरी केली नसल्याची टीका विरोधी पक्षांकडून केली जात असल्यामुळे त्याला मुंहतोड उत्तर देण्यासाठी युती सरकारने आपल्या सरकारच्या काळात आघाडी सरकारपेक्षाही अधिक उजळ कामगिरी केल्याचे दाखविण्यासाठी माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकाºयांना पाठविलेल्या प्रश्नसंचामध्ये सन २००९ ते २०१४ या काळात व २०१४ ते २०१८ या काळात झालेल्या कामांची फक्त आकडेवारी नमूद प्रश्नासमोर भरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या प्रश्नांमध्ये प्रामुख्याने कृषी विषयक योजनांची प्रगती, जलयुक्त शिवार योजनांची कामे, आवास योजनांची अंमलबजावणी, रोजगार हमी योजनेची कामे, बचत गटांची संख्येचा समावेश आहे. (पान ३ वर)पाणीपुरवठा योजनांना मंजुरी, ग्रामीण भागातील रस्ते, पानंद रस्त्यांची संख्या, राष्टÑीव व राज्यमार्गाची उभारणी, नवीन शाळांची बांधणी, डिजिटल शाळांची संख्या, वसतिगृहे, शिष्यवृत्तीचे वाटप, मुख्यमंत्री आरोग्य शिबिरातील लाभार्थींची संख्या, आयुष्यमान योजनेचे लाभार्थी, पर्यटन वृद्धी, वीज पुरवठा, वृक्षारोपण, जिल्ह्णातील गुंतवणूक, रोजगार निर्मिती, शौचालय उभारणी, नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती, मुद्रा योजनेचे लाभार्थी, एलपीजी कनेक्शन यांसह केंद्रातील संपुआ सरकारने २००८ मध्ये शेतकºयांना दिलेल्या सरसकट कर्जमाफीची तुलना करून राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेत शेतकºयांना मिळालेल्या कर्जमाफीची संख्या विचारण्यात आली आहे. गेल्या चार वर्षांत शेतकºयांना कर्जमाफीसोबतच पीकविमा, नैसर्गिक आपत्ती, बोंडअळी, गारपीट, दुष्काळी आदी सर्व प्रकारच्या मदतीची एकूण रकमेचा समावेश त्यात करण्याच्या सूचना आहेत, त्याचबरोबर आवास योजनेत प्रधानमंत्री, शबरी, रमाई अशा सर्व प्रकारच्या घरकुलांचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक जिल्हाधिकाºयांना ‘एक्सेल शीट’ पाठविलेगेल्या आठवड्यात राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकाºयांना याबाबतचे ‘एक्सेल शीट’ पाठविण्यात आले आहे. या सर्व माहितीचा आधार घेत सरकार निवडणूक प्रचारात आपली प्रतिमा ‘उजळ’ करून घेणार आहे.