नाशिक : लोकसभा निवडणूक निकालाबद्दलनाशिक शहरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये सकाळपासून उत्सुकता लागून होती. निवडणुकीचे निकाल येऊ लागल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या. सर्वसामान्य नागरिकांमध्ये मात्र देशात पुन्हा एकदा विजय मिळवून भाजपाने निर्विवाद बहुमत प्राप्त केल्याबद्दल समाधान आणि आनंद व्यक्त केला.परंतु नव्या स्थापन होणाऱ्या सरकारबद्दल मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या आहे. पेट्रोल, डिझेलचे भाव कमी व्हावेत. तसेच महागाई कमी व्हावी, अशी अपेक्षा अनेक नागरिकांनी व्यक्त केली आहे. बेरोजगारांना रोजगार मिळावा तसेच विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे, असेही मत काही नागरिकांनी व्यक्त केले. भाजपा पक्षाने लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळविले आहे. देशासाठी चांगले काम करणारे पंतप्रधान अशी मोदींची प्रतिमा आहे. छोट्या व्यापाऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.- अभय भंडारी, दुकानदार, मेनरोडदेशात भाजपाचे म्हणजे नरेंद्र मोदी यांचेच सरकार येणार होते. या सरकारबद्दल शेतकºयांच्या खूप अपेक्षा आहेत. शेतकºयांचा कर्जमाफीचा सरकारने निर्णय घेतला होता. आता शेतकºयांच्या शेत मालाला देखील चांगला भाव मिळायला हवा.- पोपटराव रावजी, शेतकरीदेशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार याबद्दल आनंद वाटला. पंतप्रधान हा सर्वसामान्यांची काळजी घेणारा माणूस आहे. त्यामुळे सर्वांना त्यांच्याबद्दल अपेक्षा असून ते पूर्ण करतील. विशेषत: महागाई कमी व्हायला हवी, अशी आमची अपेक्षा आहे.- मुरलीधर मनाजिताया, हॉटेल व्यावसायिकसर्वसामान्य छोटे व्यावसायिक आहेत. त्यांच्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी अनेक योजना जाहीर केल्या होत्या त्यामुळे त्यांचे सरकार पुन्हा निवडून आले, याबद्दल समाधान वाटते. परंतु नवीन सरकारने सर्वसामान्यांचा घरचा प्रश्न सोडविला पाहिजे. घराच्या बांधकामाचा खर्च कमी व्हावा.- पप्पू गणेशवार, मोबाइल विक्रेतामागील सरकारने चांगले काम केले म्हणून पुन्हा त्याच सरकारला जनतेने निवडून दिले. याचा आनंद वाटतो. परंतु पेट्रोल डिझेलचे भाव कमी व्हावेत. गॅससिलिंडरचे दर देखील कमी व्हायला पाहिजे. महागाई कमी व्हावी सर्वांसाठी समान कायदा हवा. तरुणांना नोकरी मिळावी.- राजेंद्र क्षत्रिय, रिक्षा चालक
सरकारकडून सर्वसामान्यांच्या अपेक्षा वाढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 1:29 AM