शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर पेच, शपथविधी लांबणीवर; ५ डिसेंबरपर्यंत नवीन सरकार स्थापन होणार?
2
एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; शिवसेना नेत्याचा दावा, नेमकं काय घडतंय?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: चांगली बातमी मिळू शकेल, धनलाभ संभवतो!
4
विधानसभेत ७८ नवीन चेहरे, जे पहिल्यांदाच आमदार बनले; कोणत्या पक्षाचे किती सदस्य?
5
काँग्रेसनं कोणत्या मार्गावर चालायला हवं? राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं, ओढली 'लक्ष्मणरेषा'!
6
"2012 पर्यंत हरी मंदिर होते...", संभलच्या शाही जामा मशिदीसंदर्भात भाजप आमदाराचा नवा दावा! शेअर केले PHOTO
7
"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!
8
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
9
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
10
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
11
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
12
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
13
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
14
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
15
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
16
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
17
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
19
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
20
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...

जिल्हास्तरावरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 12:21 AM

जिल्हास्तरावरील केंद्रस्थानी असलेल्या सातपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) तब्बल सहा वर्षांपासून पूर्णवेळ प्राचार्य आणि दोन उपप्राचार्य नसल्याने शासनाने ही संस्था पूर्णपणे वाºयावर सोडली की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. संस्थेत वरिष्ठ अधिकारीच नसल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांवर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही. शिवाय दररोजच्या कामकाजातील येणाºया अडचणी सोडविण्यासाठी वरिष्ठ उपलब्ध होत नसल्याच्या तक्र ारी वाढत आहेत.

सातपूर : जिल्हास्तरावरील केंद्रस्थानी असलेल्या सातपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) तब्बल सहा वर्षांपासून पूर्णवेळ प्राचार्य आणि दोन उपप्राचार्य नसल्याने शासनाने ही संस्था पूर्णपणे वाºयावर सोडली की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. संस्थेत वरिष्ठ अधिकारीच नसल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांवर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही. शिवाय दररोजच्या कामकाजातील येणाºया अडचणी सोडविण्यासाठी वरिष्ठ उपलब्ध होत नसल्याच्या तक्र ारी वाढत आहेत.  सातपूर येथे जिल्हास्तरीय शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) असून, संस्थेत विविध प्रकारचे २७ व्यवसाय अभ्यासक्र मासाठी अडीच हजार प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत. ५० च्या आसपास निदेशक असून, शिक्षकेतर कर्मचारीही आहेत. या संस्थेसाठी एक प्राचार्य आणि दोन उपप्राचार्य यांची शासन नियमाप्रमाणे नियुक्ती आहे. जवळपास २०१२ पासून या संस्थेला पूर्णवेळ प्राचार्य उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. ही शोकांतिका असल्याचे बोलले जात आहे, तर दोन उपप्राचार्यदेखील पूर्णवेळ दिलेले नाहीत. वास्तविक पाहता या संस्थेचा कारभार पाहणारे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनालयाचे विभागीय कार्यालय अवघ्या पाच किलोमीटर अंतरावरच आहे. जिल्ह्यात अशी परिस्थिती निर्माण होत असेल तर तालुका स्तरावर काय स्थिती असेल? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. या संस्थेत निदेशक आणि गटनिदेशक असून, अर्धवेळ प्राचार्यांनी त्यांच्या सोयीसाठी किंवा त्यांच्या अनपुस्थितीत व्यवस्था सांभाळण्यासाठी समन्वय नेमून दिलेला आहे. परंतु या समन्वयकांना कोणतेही कायदेशीर अधिकार नाहीत. तरीही गेल्या सहा वर्षांपासून हे समन्वयक आपली बिनाअधिकाराची जबाबदारी सांभाळत आहेत.तब्बल २५०० विद्यार्थी आणि ५० च्यावर शिक्षकांची संख्या असलेल्या संस्थेवर कोणाही वरिष्ठ अधिकाºयांचा अंकुश नसावा, असा प्रकार अन्य कुठेही पहायला मिळणार नाही. शिक्षक नियमित येतात की नाही? शिक्षक विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिकवितात की नाही? शिक्षकांना येणाºया अडचणी कोण सोडविणार? दैनंदिन शासकीय कामकाज असे चालत असेल? विद्यार्थी शिक्षकांना जुमानत नसतील तर त्यांची तक्र ार कोणाकडे करावी? शिक्षकांच्या अर्जंट रजा मंजुरी, त्यांच्या अतिमहत्त्वाच्या कागदपत्रांवरील स्वाक्षरी, विद्यार्थ्यांना तातडीचे लागणारे कागदपत्रे आणि त्यावरील स्वाक्षरी अशा कामांसाठी संस्थेच्या कार्यालयात पूर्णवेळ प्राचार्य असणे अत्यंत आवश्यक आहे. समन्वयक असले तरी त्यांना प्रचार्यांचे अधिकार नाहीत. शिवाय मुख्यालयाकडून येणारी तातडीचे शासकीय आणि गोपनीय कागदपत्रे हे प्रचार्यांच्याच नावाने येत असतात. त्यांचे काय? हे आणि असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.प्रभारी प्राचार्यांकडे पदभारसातपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत एक प्राचार्य आणि दोन उपप्राचार्य पदांची नेमणूक असली तरी सद्य:स्थितीत कळवण आयटीआयचे प्राचार्य सुभाष कदम यांच्याकडे सातपूर आयटीआयचा प्रभारी प्राचार्यांचा पदभार सोपविण्यात आला आहे. ते आठवड्यातून त्यांच्या सोयीने दोन तीन दिवस येतात, तर उपप्राचार्य दोन पदे असले तरी एक पद इगतपुरी टेक्निकल हायस्कूलचे मुख्याध्यापक सतीश भामरे हे प्रभारी उपप्राचार्य म्हणून काम पाहत आहेत, तर दुसरे पद मुख्यालयातील पर्यवेक्षक असलेले काकड यांच्याकडे उपप्रचार्यांचा प्रभारी पदभार सोपविण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या शासकीय संस्थेला पूर्णवेळ प्राचार्य आणि दोन उपप्राचार्य मिळू नयेत ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.अनेक गैरसोयीशनिवार दि.१४ सप्टेंबर रोजी संस्थेतील गैरसोयी आणि सुविधा तसेच शिक्षकांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात शिवसेनाप्रणीत भारतीय विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाºयांनी ठिय्या आंदोलन पुकारले होते. हे पदाधिकारी आणि संस्थेतील विद्यार्थी कमालीचे आक्र मक झालेले होते. संबंधित शिक्षकाच्या अंगावर विद्यार्थी धावून गेले होते. कोणीही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याने काही अनर्थ घडण्यापूर्वी समन्वयक प्रशांत बडगुजर यांनी वेळीच परिस्थिती सांभाळली. अन्यथा संस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली असती.

टॅग्स :NashikनाशिकEducation Sectorशिक्षण क्षेत्र