नाशिकरोड : भारत प्रतिभूती मुद्रणालय मजदूर संघाचे कार्याध्यक्ष व कामगार नेते ज्ञानेश्वर जुंद्रे यांना महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा गुणवंत कामगार कल्याण व कामगार भूषण पुरस्कार नुकताच मुंबईत एका समारंभात प्रदान करण्यात आला.
ज्ञानेश्वर जुंद्रे यांची महाराष्ट्र शासनाकडून गुणवंत कामगार पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. मुंबई येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, कामगार राज्यमंत्री बच्चू कडू, प्रधान सचिव सिंघल आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ज्ञानेश्वर जुंद्रे व मजदूर संघाचे सभासद रोहित कानडे यांना गुणवंत कामगार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.दरम्यान भारत प्रतिभूती मुद्रणालय मजदूर संघाच्या वतीने जुंद्रे व कानडे यांचा गुणवंत मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी राजेश टाकेकर, शिवाजी कदम, नंदू पाळदे, कार्तिक डांगे, उत्तम रकिबे, जयराम कोठुळे, रमेश खुळे, इरफान शेख, अनिल थोरात, राजू जगताप, प्रवीण बनसोडे, चंद्रकांत हिंगमिरे, भिमा नवाळे, नंदू कदम, अण्णा सोनवणे, विनोद लोखंडे, व्ही. एम. जगताप आदी उपस्थित होते.