शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

शासनाचे आदेश : ‘वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना’ योजना सुख-दु:खात वृक्षांची रोपे होणार साक्षीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:10 AM

नाशिक : राज्यातील वनक्षेत्र कमी झाल्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाने निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सहभाग नोंदवावा यासाठी ‘हरित महाराष्टÑ अभियान’अंतर्गत ‘वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना’ हा समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम हाती घेण्यात आला.

ठळक मुद्देवृक्षांची रोपे देऊन भावना व्यक्त करण्याचे आदेश ग्रामपंचायतीमध्ये योजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश

नाशिक : राज्यातील वनक्षेत्र कमी झाल्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाने निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सहभाग नोंदवावा यासाठी ‘हरित महाराष्टÑ अभियान’अंतर्गत ‘वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना’ हा समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, यामध्ये मानवाशी निगडीत आयुष्यातील कोणत्याही प्रसंगात वृक्षांची रोपे देऊन भावना व्यक्त करण्याचे आदेश आता शासनानेच काढले आहेत. राज्यातील वनक्षेत्र २० टक्क्यांवरून ३३ टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी शासनाच्या हरित महाराष्ट्र अभियान या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये ‘वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना’ ही योजना ग्रामविकास विभागाच्या वतीने राबविण्यात येणार आहे. याबाबत नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी दिलेल्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत सर्व ग्रामपंचायतीमध्ये योजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले आहेत. जागतिक उष्ण तपमानात सातत्याने होणारी वाढ, हवामान आणि ऋतू बदल, पाण्याचे दुर्भिक्ष, अतिवृष्टी, पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तींवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी वृक्षलागवडीचा भरीव कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे. यामध्ये समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग घेण्यात येणार आहे. यामध्ये शुभेच्छा वृक्ष, शुभमंगल वृक्ष, आनंदवृक्ष, माहेरची झाडी, आणि स्मृती वृक्ष अशी संकल्पना आखण्यात आली आहे. शुभेच्छा वृक्ष म्हणजे गावात जन्माला येणाºया बालकांच्या जन्माचे स्वागत संबंधित कुटुंबाला फळझाडांची रोपे देऊन करावे, शुभमंगल वृक्ष म्हणजे, दरवर्षी गावातील ज्यांचे विवाह होतील त्यांना फळझाडांची रोपे देण्यात यावीत, आनंदवृृक्ष म्हणजे, दरवर्षी गावातील जे विद्यार्थी दहावी व बारावी परीक्षा उत्तीर्ण होतील, नोकºया मिळतील, जे उमेदवार विविध निवडणुकांमध्ये विजयी होतील. अशा आनंदाच्या क्षणी त्यांना फळझाडाची रोपे देऊन शुभेच्छा द्याव्यात, माहेरची झाडी म्हणजेच गावातील विवाहित मुलींच्या माहेरच्या लोकांनी त्यांना फळझाडांची रोपे देऊन शुभाशीर्वाद द्यावेत आणि स्मृती वृक्ष म्हणजे, गावातील एखाद्या व्यक्तीचे वर्षभरात निधन झाल्यावर त्याच्या कुटुंबीयांना फळझाडाची रोपे देऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात यावी. अशी संकल्पना शासनाने मांडली आहे. रोपांच्या संगोपनासाठी ग्रामविकास विभागाच्या वतीने अभिनव योजना राबविण्यात येणार असून, ग्रामपंचायतीनी १ जुलै ते चालू वर्षाचे ३० जून हे वर्ष गृहीत धरून जन्म, विवाह, मृत्यू यानुसार अंदाजपत्रक तयार करून १ जुलै रोजी एकदाच रोपांचे वाटप करावयाचे आहे. याची नोंद ग्रामपंचायतीच्या रजिस्टरमध्ये करावयाची आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात ही योजना प्रभावीपणे राबविण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सर्व गटविकास अधिकाºयांना दिले आहेत.