शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

पेट्रोल पंपचालकांकडून सरकारचा निषेध

By admin | Published: June 17, 2017 12:43 AM

नाशिक : इंडियन आॅइल कार्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तीन कंपन्यांनी इंधनाच्या दरात दररोज बदल करणास सुरुवात केली आहे

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन आॅइल कार्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तीन मोठ्या कंपन्यांनी शुक्रवारपासून (दि.१६) इंधनाच्या दरात दररोज बदल करणास सुरुवात केली आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या या निर्णयाचा नाशिक जिल्हा पेट्रोल डिलर्स असोसिएशनतर्फे शनिवार (दि.१७) पासून हातावर काळ्या फिती बांधून निषेध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पेट्रोलियम मंत्रालयांच्या सूचनांनुसार शुक्रवारी सकाळी ६ वाजतापासून पेट्रोलचे दर १ रुपया १२ पैसे व डिझेलच्या दरांमध्ये १ रुपया २४ पैसे एवढी कपात करून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. परंतु हा निर्णय पेट्रोल पंपचालकांसाठी अतिशय त्रासदायक असल्याची प्रतिक्रिया नाशिक जिल्हा पेट्रोल डिलर्स असोसिएशनतर्फे व्यक्त होत आहे. तसेच इंधनाच्या दरांमध्ये होणाऱ्या चढउताराचा प्रवासी वाहतुकीच्या भाड्यावर व मालवाहतुकीवरही परिणाम होत असतो. अशा स्थितीत सरकार रीक्षा, टॅक्सी, बसेची भाडेआकारणी संबंधी रोज टेरीफमध्येही बदल करणार का? असा सवालही पेट्रोल पंपचालकांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, पेट्रोल कंपन्यांनी दररोज दर बदलण्याचा निर्णय जाहीर केला असला तरी शहरातील काही पेट्रोलपंपांवर शुक्रवारी सकाळी उशिरापर्यंत नियमित दरांनी पेट्रोल विक्री होत असल्याने नागरिकांनी पट्रोलपंपचालकांविरोत संताप व्यक्त केला. परंतु, दुपारनंतर शहरातील सर्वच पंपचालकांनी रोज दर पंपाचे कोड व कंपन्यांचे एसएमएस क्रमांक असलेले फलक लावून निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे.