नाशिक : वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त विविध महाविद्यालयांमध्ये तरुणाईकडून ‘डेज सेलिब्रेशन’ केले जाते. या संकल्पनेचा आधार घेत शिवसेनेच्या विद्यार्थी शाखेच्या वतीने शहरातील बीवायके महाविद्यालयाच्या परिसरात भाजप सरकारच्या निषेधार्थ ‘गाजर डे’ साजरा करण्यात आला. या अभिनव आंदोलनाने नाशिककरांचे लक्ष वेधून घेतले.भारतीय जनता पार्टीने सामान्य जनतेला निवडणुकपुर्व विविध आश्वासने दिली; मात्र बहुमत मिळवून सत्तेत आल्यानंतर भाजपने तीन वर्षांच्या कार्यकाळात तरु णांपासून जेष्ठांपर्यंत सामान्य जनतेला आश्वासनरुपी गाजर दाखविले. जणू एकप्रकारे सत्ताधारी राज्य व केंद्र सरकारने जनतेची फसवणूक केल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी े गुरूवारी (दि.१५) सरकारचा निषेध ‘गाजर डे’ या अभिनव आंदोलनातूनकेला.राम मंदिर तसेच शिवस्मारक, आंबेडकर स्मारक उभारणीच्या आश्वासनापासून जीवनावश्यक वस्तूंच्या दररोज होणा-या दरवाढ कमी करण्याया आश्वासनापर्यंत कोणतेही आशवासन सरकारने अद्याप पुर्ण केले नाही. या सरकारला तीन वर्षांमध्ये संपूर्णत: अपयश आले असून शेतकर्यांची कर्जमाफी, बाहेर देशातील काळापैसा परत आणणे तरुणांचे शिक्षण व रोजगाराच्या समस्यांवर सरकार सकारात्मक तोडगा काढू शकलेले नाही, असे यावेळी विरोधी पक्षनेता शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी यावेळी सांगितले.बी.वाय.के. कॉलेज येथे भारतीय विद्यार्थी सेनेचा गाजर डे साजरा करून केला सरकारचा निषेध केला. या प्रसंगी गटनेते विलास शिंदे, भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा संघटक योगेश बेलदार, नगरसेवक डी.जी. सूर्यवंशी, शामकुमार साबळे, संतोष गायकवाड, संदीप गायकर, दिगंबर मोगरे, अमोल सूर्यवंशी, देवा जाधव, अंबादास जोशी, उमेश चव्हाण आदि उपस्थित होते. काही दिवसांपुर्वीच शिवसेनच्या वतीने द्वारकेवर चक्का जाम आंदोलन करण्यात आले होते. यावेळी सरकारच्या इंधन दरवाढीचा निषेध व्यक्त करत सुमारे तीन तास वाहतूक रोखली होती.
सरकारचा निषेध : महाविद्यालयाच्या द्वारावर नाशिकमध्ये शिवसैनिकांचा ‘गाजर डे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 4:19 PM
काही दिवसांपुर्वीच शिवसेनच्या वतीने द्वारकेवर चक्का जाम आंदोलन करण्यात आले होते. यावेळी सरकारच्या इंधन दरवाढीचा निषेध व्यक्त करत सुमारे तीन तास वाहतूक रोखली होती.
ठळक मुद्देकाही दिवसांपुर्वीच शिवसेनच्या वतीने द्वारकेवर चक्का जाम आंदोलनाप्रसंगी रस्त्याने ये-जा करणा-या नागरिकांच्या हातात गाजर देण्यात आले.सरकारला तीन वर्षांमध्ये संपूर्णत: अपयश आले