देवळा येथे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन आणि महत्त्वाच्या सूचना देण्यासाठी देवळा शहर व तालुक्यातील सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, पोलीस पाटील, लोकप्रतिनिधी यांची शांतता समितीची बैठक देवळा येथील डॉ. दौलतराव आहेर सभागृहात आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस निरीक्षक देवीदास भोज यांनी केले. प्रभारी तहसीलदार विजय बनसोडे यांनी मनोगत व्यक्त करत कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका लक्षात घेता गणेशोत्सव सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत साध्या पद्धतीने व शांततेने साजरा करण्याचे आवाहन केले.
यावेळी देवळा तहसीलदार विजय बनसोडे, पोलीस निरीक्षक देवीदास भोज, देवळा नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष अतुल पवार, माजी गटनेते जितेंद्र आहेर, मुन्ना अहिरराव, पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष योगेश पाटील यांच्यासह तालुक्यातील सर्व पोलीस पाटील, गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
(०८ देवळा)
देवळा येथे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना अमोल गायकवाड, समवेत विजय बनसोडे, देवीदास भोज, अतुल पवार, जितेंद्र आहेर आदी.
080921\4627032708nsk_46_08092021_13.jpg
देवळा येथे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना अमोल गायकवाड, समवेत विजय बनसोडे, देविदास भोज, अतुल पवार, जितेंद्र आहेर आदी.