वेळ : सायंकाळी ६.३० वाजता.स्थळ : जॉगिंग ट्रॅक, ज्येष्ठ नागरिक कट्टा, शरणपूररोडनाशिक : लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारीत मोठी वाढ झाली होती. यामुळे स्थिर सरकार येण्यास याचा फायदा झाला. मतदानाची खरी उत्सुकता असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा लोकशाही बळकटी करण्यात महत्त्वाचा वाटा असतो. राज्यातही पुढील महिन्यातील २१ तारखेला मतदान होणार असून, नव्याने स्थापन होणाऱ्या सरकारने भ्रष्टाचार थांबवावा तसेच तरुणांचा बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्याची गरज असल्याची अपेक्षा शरणपूर रोडवरील कृषिनगर जॉगिंग ट्रॅक येथील ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्तकेली आहे.निवडणुका आल्या की प्रथम ज्येष्ठ नागरिकांचीच उमेदवारांना आठवण येते असे मत एकाने व्यक्त केले त्यावर दुसºयाने सगळेच उमेदवार सारखेच असल्याचे सांगितले. यावर एका ज्येष्ठाने आपले परखड मत व्यक्त करत सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी एका महिलेने त्यांच्या मतदारसंघातील प्रलंबित कामांवर व रस्त्यांच्या अवस्थेबद्दल नाराजी दर्शविली. त्यावर एकाने राजकारणात फक्त गुंड प्रवृत्तीचे लोक असल्याचे सांगितले. तसेच एकाने सगळे खडे सारखेच असल्याचे सांगत शहरातील एका लोकप्रतिनिधींच्या मालमत्तेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केला. त्यावर एकाने सरकार चांगले आहे, मात्र त्यांचे आमदार भ्रष्टाचारी असल्याचे मत व्यक्त केले.( या चर्चेत प्रतिभा काळे, रमेश येवले, अभय कुमार जोशी, कृष्णराव रासने, प्रकाश कनसारा, रावबा रोकडे, प्रदीप चव्हाण, प्रदीप बेंद्र, किशोर भुसारी आदींनी सहभाग घेतला.)सरकार कुठलेही येवो मात्र राज्यातील भ्रष्टाचार कमी होताना दिसून येत नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधी कामाच्या नावाखाली पैसे उकळतात व स्वत:चे घर भरतात. त्यामुळे सामान्यांचा कर स्वरूपात भरलेला पैसा जातो तरी कुठे, असा प्रश्न या ज्येष्ठांनी यावेळी उपस्थित केला. तसेच अनेक वेळा निवडून येऊनही लोकप्रतिनिधी त्यांच्या मतदारसंघातील सामान्य प्रश्न सोडवू शकत नसल्याचे मत या ज्येष्ठांनी मांडले.
भ्रष्टाचारावर आळा घालण्यावरच सरकारने भर द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 1:28 AM