शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

शासनाने कांदे फुकट वाटावेत : अर्जुन बोराडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 1:40 AM

केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यात बंदी चा निर्णय घेतला यामुळे शेतकरी रस्त्यावर उतरले . विविध संघटना राजकीय पक्षानी आंदोलन सुरु केले . जिल्'ात एकेकाळी प्रभावी असलेल्या शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेने खासदारांच्या घरासमोर राख रांगोळी आंदोलनाची घोषणा केली आहे . या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अर्जुनतात्या बोराडे यांच्याशी साधलेला संवाद

ठळक मुद्देआज सर्वच गोष्टिंचे भाव वाढले आहेत . यामुळे कांदा उत्पादन खर्च वाढला आहे . अंतरराष्ट्रीय बाजारात भारताची विश्वासही संपुष्टत येईल

नाशिक- लॉकडाउननंतर प्रथमच कांद्याला थोडाफ़ार भाव मिळू लागला असतानाच केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यात बंदी चा निर्णय घेतला यामुळे शेतकरी रस्त्यावर उतरले . विविध संघटना राजकीय पक्षानी आंदोलन सुरु केले . जिल्'ात एकेकाळी प्रभावी असलेल्या शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेने खासदारांच्या घरासमोर राख रांगोळी आंदोलनाची घोषणा केली आहे . या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अर्जुनतात्या बोराडे यांच्याशी साधलेला संवाद ....प्रश्न : निर्यातबंदी निर्णयाचे काय परिणाम होतील ?

बोराडे : या निर्णयामुळे कंद्याचे भाव तर कोसळतीलच पण त्याच बरोबर अंतरराष्ट्रीय बाजारात भारताची विश्वासही संपुष्टत येईल . निर्यात कमी झाल्यास त्याचा मोठा फ़टका शेती क्षेत्राला बसेल . शासनाच्या धोरणामुळे आधीच भारतीय मालाची मागणी चाळीस टक्क्यांनी घटली आहे.प्रश्न : कांदा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी साठी काय सुचवावेसे वाटते ?

बोराडे : देशात कांद्याचे भाव वाढले की, शासन निर्यातबंदी करते हे पूर्णपणे चुकीचे आहे. वास्तविक भाव वाढ कायम रहात नाही तर एक दोन महीने असते . तेवढा वेळ ग्राहक समजून घेतात . या काळात शासनाने कांदा खरेदी करून तो ग्राहकांना फुकट वाटावा पण कोणत्याही परिस्थितीत निर्यात बंद करू नये हाच यावरील कायमचा उपाय आहे.प्रश्न : सध्या कांद्याला जास्त भाव मिळाले असे सांगितले जाते. मात्र, आता मिळणारा भाव तरी शेतकऱ्यांना परवडतो का ?

बोराडे : आज सर्वच गोष्टिंचे भाव वाढले आहेत . यामुळे कांदा उत्पादन खर्च वाढला आहे . दोन ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल दराने कांदा विकुनही शेतकऱ्यांना कांदा उत्पादन परवडत नाही . विविध नैसर्गिक अपत्तिमध्ये शेतकरयांचे मोठे नुकसान होते त्या वेळी कुणी त्यांना विचारत नाही आणि भाव वाढले की सर्वांच्या भुवया उंचावतात हे चुकीचे आहे . हा शेतकरयांवर मोठा अन्याय आहे.मुलाखत- संजय दूनबळे

टॅग्स :Nashikनाशिकonionकांदाagricultureशेती