नाशिक : जिल्हा रुग्णालयाच्या एसएनसीयू विभागात झालेल्या नवजात अर्भक मृत्यू प्रकरणानंतर प्रामुख्याने समोर आलेला नाशिकमधील लेव्हल तीन शिशुविभागाच्या प्रश्नाबाबत राज्यशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे़ विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात हा शिशुविभाग तयार करण्यात यावा यासाठीच्या प्रस्तावाबाबत शासनाने पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे़ आरोग्य विभागाच्या सहसंचालका डॉ. अर्चना पाटील यांनी मंगळवारी (दि़१२) संदर्भ सेवा रूग्णालयास भेट देत याबाबत चाचपणी केली़जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयु विभागात इन्क्युबेटरची संख्या व उपचारासाठी दाखल होणाºया अर्भकांची संख्या यामध्ये मोठी तफावत आहे़ त्यामुळे गत तीन महिन्यात मोठ्या संख्येने अर्भकांचा मृत्यू झाला़ याची गंभीर दखल घेत आरोग्यमंत्री डॉ़दीपक सावंत यांनी जिल्हा रुग्णालयास भेट देत पाहणी केली असता जिल्हा रुग्णालयावरील ताण समोर आला़गर्भवती मातांमध्येच कुपोषणाचे प्रमाण अधिक असल्याने अर्भकाची वाढ होत नाही व ते कमी वजनाचे जन्मास येते़ या बालकांसाठी लेव्हल तीनचा शिशुविभाग आवश्यक असतो़ मात्र यासाठी सुपरस्पेशालीटी रुग्णालयाची आवश्यकता असते व ते नाशिकमध्ये केवळ संदर्भ सेवा रुग्णालयातच आहे़ याठिकाणी हा विभाग सुरू करावा यासाठी विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी मंत्रालयात प्रस्ताव दिला होता़ या प्रस्तावावर आरोग्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेऊन पाटील यांना चाचपणी करण्यासाठी संदर्भमध्ये पाठविण्यात आले होते़विशेष कार्यक्रमगर्भवती माताच कुपोषित असल्यामुळे मुलेही कुपोषित जन्मास येतात़ त्यामुळे गर्भवती माता कुपोषण रोखण्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे़ नाशिक जिल्ह्यातील कुपोषणाबाबत महिला बालकल्याण, समाजकल्याण व आदिवासी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे़- डॉ. अर्चना पाटील, आरोग्य सह संचालक
नाशिकमधील लेव्हल तीन शिशूविभागाच्या प्रस्तावाबाबत शासन सकारात्मक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 11:03 PM
नाशिक : जिल्हा रुग्णालयाच्या एसएनसीयू विभागात झालेल्या नवजात अर्भक मृत्यू प्रकरणानंतर प्रामुख्याने समोर आलेला नाशिकमधील लेव्हल तीन शिशुविभागाच्या प्रश्नाबाबत राज्यशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे़ विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात हा शिशुविभाग तयार करण्यात यावा यासाठीच्या प्रस्तावाबाबत शासनाने पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे़ आरोग्य विभागाच्या सहसंचालका डॉ. अर्चना पाटील यांनी मंगळवारी (दि़१२) ...
ठळक मुद्देआरोग्य विभागाच्या सहसंचालका डॉ. अर्चना पाटील यांची संदर्भ सेवा रूग्णालयास भेट गर्भवती माता कुपोषण रोखण्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेतला जाणार