कळवण (नाशिक)- अटल आरोग्य शिबिराच्या माध्यमातून राज्य शासन आदिवासी आणि दुर्गम भागातील शेवटच्या गरजू व्यक्तिपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवेल, अशी ग्वाही मुख्यमंत्नी देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नांदुरी येथे आयोजित अटल ग्रामीण आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्र माला पालकमंत्नी गिरीष महाजन, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार डॉ. राहुल आहेर,बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, जे.पी.गावीत, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, विभागीय आयुक्त राजाराम माने, विशेष पोलिस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, पोलिस अधिक्षक संजय दराडे, डॉ. रागीणी पारेख, डॉ.अजय चंदनवाले, डॉ. एम. डी. तावडे, कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर आादी उपस्थित होते. मुख्यमंत्नी म्हणाले, वैद्यकीय क्षेत्नात विविध प्रकारचे संशोधन होत आहे. अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहेत. मात्न त्यांचा खर्च अधिक असल्याने सामान्य माणूस रोगाचे निदान झाले तरी उपचारापासून दूर राहतो, बर्याचदा यामुळे रु ग्णाचा मृत्यू होतो. याबाबत राज्य शासनाने आपली जबाबदारी स्वीकारु न गरजू रु ग्णांना सर्व प्रकारचे उपचार मोफत देण्याचा निश्चिय केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजनेच्या रुपाने सुरु केली. या योजनेतंर्गत देशातील उपचार करण्याची सुविधा प्राप्त झाली आहे. राज्य शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गतदेखील गरीब रु ग्णांना मोफत उपचार देण्यात येतात. दोन्ही योजनांमध्ये उपचार शक्य नसल्यास मुख्यमंत्नी सहाय्यता निधीमधून उपचार करण्यात येत आहे. कुठलीही उपचार पद्धती आण िसर्व प्रकारच्या उपचाराची सुविधा शासनाने दिली आहे, असे त्यांनी सांगितले. अटल आरोग्य शिबिराच्या माध्यमातून राज्यात आरोग्यसेवेची नवी संस्कृती पालकमंत्नी महाजन यांच्या प्रयत्नाने रु जली असल्याचे सांगून त्यांनी पालकमंत्र्यांचे अभिनंदन केले. अनेक नामवंत डॉक्टर्स समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सेवा भावनेने शिबिरात कार्य करतात, असे त्यांनी नमूद केले. आदिवासी बांधवाना वनजमीन पट्टे देण्याचे काम वेगाने सुरु असल्याचे सांगून जिल्ह्याने चांगली कामिगरी केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी यांचे अभिनंदन केले. दुष्काळात शासन जनतेच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. श्री. फडणवीस यांच्या हस्ते जनजाती गौरव यात्नेचा शुभारंभ आण िलघुपटाचे उदघाटन करण्यात आले. या यात्नेद्वारे शासनाच्या योजना आदिवासी बांधवापर्यंत पोहचतील व या समाजातील थोर व्यक्तींचा आदर्श नव्या पिढीसमोर जाईल, असेही त्यांनी सांगितले. पालकमंत्नी म्हणाले, दुर्गम भागातील आदिवासी बांधवापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचिवण्यासाठी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबीरासाठी उद्योग, संस्था, सेवाभावी संस्था यांचे सहकार्य लाभले आहे. शिबिराच्या माध्यमातून साडेतीन लाख लोकांपर्यंत डॉक्टर्स पोहोचले आहेत. गरजु रु ग्णांना मोफत शस्त्निक्रया व मोफत औषधोपचाराची सुविधा देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्नी महोदयांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सामान्य जनतेपर्यंत आरोग्य सुविधा पोहचिवण्यात येत असून मुख्यमंत्नी सहाय्यता निधीतून गेल्या तीन वर्षात मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधांसाठी निधी देण्यात आल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविकात डॉ. अहेर यांनी शिबिर आयोजनाची माहिती दिली. आदिवासी बहुल दिंडोरी, देवळा, बागलाण, सुरगाणा व कळवण तालुक्यात आरोग्य सुविधा देण्यासाठी या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. या शिबीरात सर्व पॅथीचे उपचार करण्यात येणार असून रु ग्णांवर मोफत औषधोपचार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पाहोचविण्यासाठी सरकार प्रयत्नशील-मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2018 1:51 PM