संजय पाठक/नाशिक - मर्यादा पुरूषोत्तम रामचंद्रांच्या अयोध्येतील मंदिरासाठी केंद्रात सत्तेवर असलेला भाजपा लढत असताना दुसरीकडे मात्र याच प्रभुरामचंद्राच्या पाऊलखूणा शोधण्यात आणि हा पौराणिक ठेवा जतन करण्यात मात्र तितकीच उदासिनता दिसून येत आहे. रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या नाशिक नगरीत प्रभु रामचंद्राने तयार केलेला भूयारी मार्ग शोधण्यासाठी एका रामभक्ताने केलेली याचना त्याची दखल घेण्याचा पंतप्रधान कार्यालयाने दाखवलेला उत्साह याची चर्चा होते ना होते तोच हा विषयच टोलवाटोलवी करून बासनात गुंडाळ्याची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे एक ऐतिहासिक संशोधन बारगळण्याची तयारी सुरू झाली आहे.
प्रभु रामचंद्र हा तमाम रामभक्तांचा श्रध्देचा विषय आहे. त्यामुळेच प्रभु रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या नाशिक नगर ही तितकीच महत्वाची मानली जाते. या नगरीत प्रभुरामचंद्र, सीता, लक्ष्मण यांच्या वास्तवाच्या अनेक पाऊलखुणा आहेत. त्यात सीता गुंफा, लक्ष्मण रेषा, तपोवनातील पर्णकुटी, शुर्पणखेसंदर्भातील घटनांना उजाळा देणा-या वास्तु जतन करण्यात आल्या आहेत. राजा दशरथाच्या आदेशावरून वनवासाला निघालेल्या रामचंद्रांनी पूर्वी दंडकारण्य असलेल्या या भूमीत बारा वर्षे वास्तव्य केले. रावणाची भगिनी असलेल्या शूर्पणखेचे नाक म्हणजे नासिका कापल्यानेच याच दंडकारण्यात नागरी वास्तव्य वाढल्यानंतर नाशिक नाव झाले असे सांगण्यात येते.गुहेचा इतिहासनाशिक शहरातील पंचवटी येथे श्री काळाराम मंदिरा जवळच सीता गुंफा आहे. त्याकाळी हे दंडकारण्य असल्याने येथील श्वापदे आणि अन्य कारणाने सीतेला गुहेत ठेवण्यासाठी ही गुंफा रामाने तयार केली असे सांगितले जाते. या सीता गुंफेत एक शिवालय असून त्याच्या पाठीमागील बाजूने सहा मैल अंतरापर्यंत एक भुयारी मार्ग रामाने तयार केला होता आजच्या स्थितीत ९.०४ किलो मीटर अंतराचा हा प्रवास गुहेने पूर्ण केल्यानंतर आता ज्या ठिकाणी रामशेज किल्ला आहे तेथे प्रभु रामचंद्र भुयारी मार्गाने शयनासाठी जात असते. त्यामुळेच आज येथे असलेल्या किल्ल्याला ‘रामशेज’ असे नाव आहे.गॅझेटीयर मध्ये नोंदब्रिटीशकालीन गॅझेटीयर बॉम्बे प्रेसीडेन्सी नाशिक १८८३ मध्ये यासंदर्भात उल्लेख आहे त्याच प्रमाणे की टू नाािशक त्र्यंबक या १९४१-४२ साली प्रकाशीत पुस्तकातही या भूयारी मार्गाचा ूर्ण उल्लेख आहे.भूयारी मार्गाचा शोधसदरच्या भूयारी मार्गाचा तपशील गॅझेटीयरमध्ये असल्याचे नाशिकमधील इतिहास संशोधकही मान्य करतात. हा भूयारी मार्ग आता अस्तित्वात नसल्याने आता त्याचा शोध घेतला अनेक बाबी बाहेर पडतील असा इतिहास अभ्यासकांना विश्वास आहे. नाशिकमधील गोदाप्रेमी नागरी सेवा समितीचे अध्यक्ष देवांग जानी यांनी देखील यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच थेट पत्र पाठविले. रामचंद्रांना आदर्श मानणाºया पक्षाचे सरकार असल्याने जानी यांनी २८ जून २०१७ रोजी पत्र पाठविताच पंतप्रधान कार्यालयाने तातडीने ६ जुलै २०१७ रोजी केंद्रीय पुरात्व खात्याला पत्र पाठविले आणि उचित कार्यवाही करण्यास सांगितले. अवघ्या दहा बारा दिवसात पंतप्रधान कार्यालयाने ही दखल घेतल्याने नाशिकमधील तमाम रामभक्तांना आनंद वाटला परंतु अवघ्या चार महिन्यातच तो मावळला आहे. त्याचे कारण म्हणजे सरकारी अनास्था!पत्रापत्रीवर बोळवणकेंद्र सरकारने हे पत्र औरंगाबाद स्थित पुरातत्व विभागाला पाठविले त्याचा पाठपुरावा केल्यानंतर या कार्यालयाचे तेथील अधिकाºयाने धक्कादायक माहिती दिली. पुरातत्व खात्याकडे म्हणजे आर्कियॉलॉजीकल सर्वे आॅफ इंडीयाच्या सर्वेनुसार या वास्तूंची या कार्यालयाकडे नाही आणि दुसरे म्हणजे भूयारी मार्ग शोधण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नाही त्यामुळे हेच केंद्रीय पुरातत्व खात्याला कळविले असल्याचे सांगितले. त्यामुळे जानी यांनी केंद्रीय पुरातत्व खात्याकडे पाठपुरावा केला. तर त्यांनीही आॅर्कियॉलॉजीकल सर्वेमध्ये सीता गुंफा आणि रामशेज किल्ला याचा उल्लेख नसल्याने यासंदर्भातील पत्र पुन्हा महाराष्टÑ सरकारला पाठविल्याचे कळविण्यात आले. त्यामुळे जानी यांना धक्काच बसला.तर ते रहस्यच राहणार...सीतागुंफेतील हा भूयारी मार्ग शोधला गेल्यास रामकालीन दस्तावेज उपलब्ध होतील शिवाय रामचंद्रांच्या नाशिकमधील वास्तव्याबाबत शिक्कामोर्तब होईल असे रामभक्तांचे म्हणणे आहे. परंतु आता केंद्र आणि राज्य सरकारच्या उदासिनतेमुळे आता ते रहस्यच राहण्याची शक्यता आहे.‘ प्रभु रामचंद्राच्या काळातील ही गुहा असल्याचे अनेक जुने जाणते नाशिककर आणि अभ्यासक सागंतात तसे दस्तावेज उपलब्ध असताना केवळ सरकारी अधिकाºयांच्या टोलवा टोलवीने भूयार शोधण्यास टाळाटाळ केली जात आहे. केवळ श्रध्देचा भाग किंवा पौराणिक संदर्भच नव्हे तर अभियांत्रिकी शास्त्रासंदर्भातही हे महत्वाचे ठरणार आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पत्र पाठवून पुन्हा एकदा भूयारी मार्गाचा शोध घेण्याची विनंती केली आहे. - देवांग जानी, अध्यक्ष, गोदाप्रेमी नागरी सेवा समिती