त्र्यंबकेश्वर : राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी गुरुवारी त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर, त्र्यंबकेश्वर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा त्र्यंबकेश्वर देवस्थानचे सचिव डॉ. प्रवीण निकम यांनी स्वागत केले. यावेळी उपनगराध्यक्ष कैलास चोथे, नगरसेवक स्वप्नील शेलार, सागर उजे, रवींद्र सोनवणे, कुणाल उगले, काळू भांगरे आदी उपस्थित होते. दरम्यान, राज्यपालांनी सोवळे परिधान करून रु द्राभिषेक केला.देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाचे विश्वस्त तथा पुरोहित प्रशांत ऊर्फगंगागुरु गायधनी, अक्षय लाखलगावकर यांनी पौरोहित्य केले. महाराष्ट्रातील जनतेसाठी निरोगी आरोग्य व धनसंपदा लाभण्याचे साकडे राज्यपालांनी त्र्यंबकराजाला घातले. यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख शर्मिष्ठा वालावलकर, प्रांताधिकारी तेजस चव्हाण, येवल्याचे प्रांताधिकारी राजेंद्र पाटील, त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार दीपक गिरासे, नायब तहसीलदार रामकिसन राठोड, सुदेश निरगुडे, सुरेश कांबळे, सहायक पोलीस निरीक्षक रामदास कर्पे, ज्ञानेश्वर वारे, देवस्थानचे वरिष्ठ अधिकारी राजाभाऊ जोशी, प्रशासकीय अधिकारी समीर वैद्य, सुरक्षा अधिकारी अमित टोकेकर, जनसंपर्कअधिकारी रवि जाधव आदी उपस्थित होते.
राज्यपालांनी घेतले त्र्यंबकेश्वराचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 12:46 AM