नाशिक : ‘गोविंदा रे गोपाळा’ अशा प्रकारची गाणी म्हणत श्रीकृष्ण-राधेच्या वेशभूषेत नृत्य करीत विद्यार्थ्यांनी दहीहंडीचा उत्सव जल्लोषात साजरा केला. तसेच विविध संस्था-संघटना यांच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरासह सिडको, सातपूर, इंदिरानगर, पंचवटी आदि उपनगरांमध्येही दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला.श्रीकृष्ण जन्मोत्सव श्री पंचमुखी हनुमान मंदिरात साजरा करण्यात आला.महंत भक्तिचरणदास यांच्या हस्ते शालिग्राम भगवंतांना ११०० कमळपुष्प व श्री विष्णुसहस्त्रनाम आवर्तनासह तुलसीदल करण्यात आले. भगवान कृष्णाला पंचामृत स्नान, अभिषेक करून पूजन करण्यात आले. नंतर रात्री १२ वाजेपर्यंत अखंड भजन व जन्मोत्सवानंतर सामूहिक आरतीने व प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमास महंत नृसिंहाचार्य महाराज, रामदास महंत पद्मचरणदास, महंत महेश गिरी राधे राधे बाबा, पुजारी तुलसीदास, ईश्वरभाई पटेल, राजूभाई पोद्दार, बाळासाहेब विधाते, ईश्वर मावाणी, बालकिसन अग्रवाल, हरी उगलमुले, राहुल बर्वे आदि उपस्थित होते.
गोविंदा रे गोपाळा...
By admin | Published: August 27, 2016 10:42 PM