नाशिक : गोविंदा रे गोपाला..., आज गोकुळात आनंद झाला..., कृष्ण जन्मला गं सखे..., अशा विविध भक्तीपर गीतांनी शहरातील श्रीकृष्ण मंदिरे दुमदुमली. शहर व परिसरात श्रीकृष्ण भक्तांनी कृष्णजन्माष्टमीचा उत्सव पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा केला. सोमवारी (दि.३) १२ वाजता श्रीकृष्ण मंदिरांमध्ये जन्मोत्सव दहीहंडी फोडून साजरा झाला.द्वारका येथील वृंदावननगरमध्ये असलेल्या श्री राधा मदनगोपाल मंदिर, इस्कॉन येथे रात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. संध्याकाळी ६ वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पहावयास मिळाली. सकाळी मंगल आरती, महामंत्र जप, दर्शन आरती, श्रीमद् भागवत प्रवचन-कीर्तन रात्री साडेदहा वाजेपर्यंत सुरू होते. त्यानंतर नऊ ते रात्री अकरापर्यंत महाभिषेक करण्यात आला. साडेअकरा ते १२ वाजेपर्यंत महाआरती होऊन श्रीकृष्ण जन्म साजरा करण्यात आला. सोमवारी सकाळपासून श्रीकृष्ण जन्माष्टमीचा महामहोत्सव इस्कॉन मंदिरात पार पडणार आहे. जन्माष्टमीनिमित्त मंदिर पूर्णवेळ भाविकांना दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते. कापड बाजारातील श्री मुरलीधर मंदिरातही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सप्तमी-अष्टमीच्या मुहूर्तावर सकाळी ९ वाजता पवमान अभिषेक करण्यात आला. तसेच रात्री १२ वाजता भगवान श्रीकृष्ण यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. सोमवारी सकाळी अर्धनारीनटेश्वर रूपात येथील भगवान श्रीकृष्णाचे भाविकांना दर्शन घेता येणार आहे. पंचवटी कारंजा येथे नवनीत प्रियाजी कृष्ण मंदिरा, केवडीबन येथील जलाराम मंदिरातही श्रीकृष्ण जन्मोत्सव गुजराती भाविकांकडून साजरा केला जाणार आहे. तसेच जुना आडगावनाका येथील स्वामीनारायण मंदिरातही श्रीकृष्ण जन्म सोमवारी रात्री साजरा केला जाणार आहे.दरम्यान, महानुभाव पंथात पंचकृष्ण अवतारांपैकी पहिला अवतार भगवान श्रीकृष्ण यांचा मानला जातो. यानिमित्त जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मोरवाडी येथील मंदिरात आकर्षक फुलांची सजावट व रोषणाई करण्यात आली होती. येथील मंदिरात देवाच्या मूर्तीभोवती फळाफुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.आज गोपालकाला उत्सवशहरात आज ठिकठिकाणी दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे. उपवासाचे पारणे फेडून श्रीकृष्ण भक्तांकडून गोपालकाला साजरा केला जाणार आहे. मातीच्या मडक्यात ज्वारीच्या लाह्या, पोहे, खोबरे, दही-साखर आदि पदार्थ एकत्रित कालवतात त्यालाच ‘दहीकाला’ असे म्हटले जाते. या मडक्याला सजवून उंचावर लटकविले जाते. ‘गोविंदा आला रे आला...’ अशा विविध गीतांच्या तालावर थिरक त मानवी मनोरे रचून उंचावरील दही हंडी फोडण्याचा प्रयत्न आज शहरातील काही चौकांमध्ये होणार आहे.
गोविंदा रे गोपाळा यशोदेच्या तान्ह्या बाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2018 1:28 AM
नाशिक : गोविंदा रे गोपाला..., आज गोकुळात आनंद झाला..., कृष्ण जन्मला गं सखे..., अशा विविध भक्तीपर गीतांनी शहरातील श्रीकृष्ण मंदिरे दुमदुमली. शहर व परिसरात श्रीकृष्ण भक्तांनी कृष्णजन्माष्टमीचा उत्सव पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा केला. सोमवारी (दि.३) १२ वाजता श्रीकृष्ण मंदिरांमध्ये जन्मोत्सव दहीहंडी फोडून साजरा झाला.
ठळक मुद्देजन्माष्टमी : श्रीकृष्ण मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम