शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
2
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
3
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
4
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
5
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
6
Laxmi Pujan 2024: लक्ष्मीपूजेत केरसुणीची पूजा केल्यावर लक्षात ठेवा 'हे' नियम; अन्यथा पूजा जाईल व्यर्थ!
7
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
8
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
9
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
11
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
12
Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
13
५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."
14
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
15
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
16
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
17
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
18
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
19
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
20
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल

गोविंदा रे गोपाळा...

By admin | Published: August 26, 2016 12:28 AM

गोविंदा रे गोपाळा...

नाशिक : शहरात विविध शाळांमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी तसेच गोपाळकाल्यानिमित्त दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी गोविंदा आला रे आला... असे गाणे म्हणत नृत्याचा फेर धरला. यावेळी सर्वांना दहीकाल्याचा प्रसाद वाटण्यात आला.रासबिहारी शाळारासबिहारी इंटरनॅशनल स्कूलमधील शिशुवृंद, प्राथमिक, आणि माध्यमिक विभागात कृष्ण जन्माष्टमीनिमित्त आयोजित कार्यक्रम उत्साहात झाला. शाळेतील सर्व मुले पारंपरिक वेशभूषेत उपस्थित होती. मुलांच्या सोबतीने श्रीमती श्रेयसी राय यांनी राधे गोविंद बोलो, गाधे गोविंद बोलो हे राधा-कृष्णावर आधारित गाणे प्रस्तुत केले. के. के. वाघ कॉलेजचे फाइन आर्टचे प्रा. भूषण कोमडे हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. सूत्रसंचालन विजया बच्छाव हिने केले.युनिव्हर्सल अकॅडमीयुनिव्हर्सल अकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूल, गुलाबनगर, पंचवटी येथे गोपाळकाला उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास शाळेचे अध्यक्ष अर्जुन टिळे, प्रा. वैशाली टिळे, मुख्याध्यापक शैला सांगळे, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थी राधा-कृष्णाच्या रूपात सहभागी झाले. काही विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. तसेच कार्यक्रमाच्या गोविंदांनी नृत्यांच्या तालावर दहीहंडी जल्लोषात फोडली.पेंग्विन इंग्लिश मीडियम स्कूलशिवाजीनगर येथील पेंग्विन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दहीहंडीचा कार्यक्र म उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी कृष्णाची वेशभूषा करून दहीहंडी फोडण्याचा आनंद घेतला. यावेळी अमोल पाटील, शाळेच्या संचालिका ज्योती पाटील, कटाळे, संचालक यश कटाळे यांनी बालगोपाळांसह दहीहंडी उत्सवात सहभाग घेऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला.शिशुविहार शाळासेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचलित शिशुविहार इंग्रजी माध्यम येथे गोकुळाष्टमीनिमित्त दहीहंडीचा कार्यक्र म आयोजित करण्यात आला होता. मुले राधा व कृष्णाच्या वेशभूषेत छान सजून आले होते. नर्सरीची राधा-कृष्ण वेशभूषा स्पर्धाही यानिमित्ताने घेण्यात आली होती. स्वाती देशपांडे यांनी कृष्णजन्माची माहिती व गोष्ट सांगितली. मुलांनी विविध गाण्यांवर फेर धरला. यावेळी दहीहंडी फोडण्यात आली. मुलांनी कृष्णाची गोष्ट सांगितली व गाणीही सादर केली. विभाग प्रमुख नेहा सोमण यांचे मार्गदर्शन लाभले.व्यंकटराव हिरे प्राथमिक विद्यालयसिडको येथील लोकनेते व्यंकटराव हिरे प्राथमिक विद्यालयात गोपाळ कालानिमित्त दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अनेक विद्यार्थी राधा व कृष्ण यांच्या वेशभूषेत आलेले होते. कार्यक्रमासाठी परिसरातील पालक वर्ग तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित राहून दहीहंडीचा कार्यक्रम आनंदाने साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.