नाशिक : कोरोनाच्या संकटामुळे उपासमारीच्या खाईत सापडलेल्या बॅण्ड पथकाचे चालक, मालक आणि कारागीर यांच्या विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्हा बॅण्ड असोसिएशनचे अध्यक्ष शेख मास्टर यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष तथा आमदार नरहरी झिरवाळ यांच्याकडे निवेदन सादर करत कलाकांची कैफियत मांडली. तसेच कलाकारांच्या विविध मागण्यांवर चर्चा करत त्यावर शासनाच्या माध्यमातून तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली.कोरोनामुळे देशात लॉकडाउन असल्याने अनेक सोहळे रद्द झाले आहेत. यामुळे बॅण्ड पथकांच्या अनेक कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे, परंतु फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत व मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करून कमी गर्दीच्या सोहळ्यांना शासनाने परवानगी दिल्यास बॅण्ड व्यावसायिकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटेल. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात लग्नसराई असते. या कालावधीतच बॅण्ड चालक, मालक व या संबंधित व्यावसायिकांचा सुगीचा काळ असतो, परंतु यंदा कोरोना आलेले संकट पाहता सर्वांच्याच जगण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे.नाशिक जिल्ह्यातील सुमारे दोन हजार बॅण्ड पथकांचा हा हंगाम गेला आहे. मालकांकडून कारागिरांना आगाऊ रक्कम दिली होती. मात्र, मालकांनाच आता जगण्याचा प्रश्न पडला आहे. त्यातही सदन मालकांकडून अजूनही कारागिरांच्या कुटुंबांना आर्थिक मदतीसह जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केले जात आहे. मात्र, उदरनिर्वाहाचे साधनच नसल्याने व्यथा मांडायची कुठे असा प्रश्न पडला आहे. यामुळे शासनाने बॅण्ड पथकांचा व कलावंतांचा विचार करून तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी शेख मास्टर यांनी निवेदनात नमूद केली आहे.निवेदन देताना दिंडोरीचे तालुकाध्यक्ष योगेश शिंदे,उपाध्यक्ष हिरा शेख, डॉ. राजू गायकवाड, रमेश बोरस्ते आदी बॅण्ड पथकांचे चालक, मालक व कलावंत उपस्थित होते.
बॅण्ड वादकांसाठी शासनाला साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 11:41 PM
कोरोनाच्या संकटामुळे उपासमारीच्या खाईत सापडलेल्या बॅण्ड पथकाचे चालक, मालक आणि कारागीर यांच्या विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्हा बॅण्ड असोसिएशनचे अध्यक्ष शेख मास्टर यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष तथा आमदार नरहरी झिरवाळ यांच्याकडे निवेदन सादर करत कलाकांची कैफियत मांडली. तसेच कलाकारांच्या विविध मागण्यांवर चर्चा करत त्यावर शासनाच्या माध्यमातून तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली.
ठळक मुद्देउपासमार । शेख मास्टर यांच्यासह शिष्टमंडळाचे झिरवाळ यांना निवेदन