सिन्नर : सिन्नर शहर व परिसरात मोटार सायकल चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात येत असल्याने आडवा फाटा परिसरातील नाकेबंदीत दुचाकी चोरटा पोलिसांच्या जाळ्यात सापडला. संशयीत आरोपीकडून चोरीच्या सात दुचाकी हस्तगत करण्यात सिन्नर पोलिसांना यश आले आहे.मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलीस अधीक्ष संजय दराडे, अपर अधीक्षक विशाल गायकवाड व उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक गिºहे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांनी नाकाबंदी करण्याच्या सूचना सिन्नर पोलिसांना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक गणेश परदेशी, भगवान शिंदे, सचिन गवळी, विनोद टिळे, प्रविण गुंजाळ, अंकुश दराडे, राकेश गुंबाडे या कर्मचाºयांनी आडवा फाटा परिसरात नाकाबंदी सुरु केली होती. या दरम्यान विनानंबर प्लेट प्लेझर लाल रंगाच्या दुचाकीवर गणेश उदयसिंग मांडवडे पाटील (१९, रा. प्लॉट नं.२, जयशंकर अपार्टमेंट, जाधव कॉलनी, मखमलाबाद, नाशिक) याला पोलिसांनी अडविले. मांडवेड पाटील याच्याकडे पोलिसांनी दुचाकीच्या कागदपत्रांची विचारणा केली असताना त्याने उडावाउडवीचे उत्तरे दिले. त्यामुळे पोलिसांचा संशय बळविल्याने संशयीत मांडवडे-पाटीलला ताब्यात घेऊन खाक्या दाखिवल्या.संशयीत मांडवडे-पाटीलने सिन्नरच्या सातपीर गल्लीतून सदरची दुचाकी चोरल्याची कबुली दिली. कसून चौकशी केल्यानंतर मांडवड-पाटीलकडून सिन्नर, गिरणारे आणि बोधेगाव (ता.शेवगाव) चोरीच्या सात दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या.