नाशिक : विश्रांतीनंतर गणेश चतुर्थीपासून वरुणराजाने पुन्हा जिल्ह्यावर कृपादृष्टी केली आहे. शुक्रवारपासून सातत्याने जोरदार पाऊस जिल्ह्याच्या काही तालुक्यांमध्ये सुरू असल्यामुळे धरणांमधून पुन्हा विसर्ग वाढविण्यात आला आहे. पालखेड धरण समूहातील डझनभर धरणांचा साठा ८०च्या पुढे सरकला आहे. शहरात संततधारेसह ग्रामीण भागात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणांचा जलसाठा वाढला आहे. गंगापूर धरण समूहातील सर्व धरणे जवळपास पूर्ण भरली असून विसर्ग सातत्याने सुरू आहे. गंगापूर धरणाचा जलसाठा ९४ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पावसाचा जोर अधिक असल्यामुळे जिल्ह्णातील धरणांमधील पाण्याची पातळी वाढली असून, विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गोदावरी खोºयावरील गंगापूर धरण समूहात कश्यपी, गौतमी, आळंदी हे तीन मध्यम प्रकल्पाअंतर्गत बांधण्यात आलेली धरणे आहेत. या धरणांमध्ये अनुक्रमे प्रत्येकी एक हजार ३८५, १८५६ आणि ९७० दलघफू इतका पाणीसाठा आहे. धरणांची क्षमता लक्षात घेता गंगापूर ९४, तर कश्यपी ९९ टक्के भरले आहे तर उर्वरित गौतमी ९९ आणि आळंदी १०० टक्के भरले आहे. इगतपुरी तालुक्यात ४९ तर सुरगाणा ३९ मि. मि. पाऊस झाला.धरणांचा विसर्ग असा....(क्यूसेकमध्ये)दारणा - ५,९२०पालखेड-३,८५२कडवा-६३६वालदेवी-२४१आळंदी-४५०पालखेड धरण समूहाची स्थिती उत्तमपालखेड धरण समूहाची स्थितीही यंदा उत्तम आहे. पालखेड धरण ७३ टक्के, करंजवण ९९ टक्के, तर वाघाड १०० टक्के भरले आहे. ओझरखेड १०० टक्के, पुणेगाव ९३ टक्के आणि तिसगाव धरण १०० टक्के भरले आहे. दारणा धरणात ७ हजार ११९ दलघफू इतका जलसाठा असून, धरण १०० टक्के भरले आहे. भावली धरण ओव्हरफ्लो आहे. मुकणे ७३ टक्के भरले आहे. वालदेवी आणि कडवा १०० टक्के भरले आहेत. भोजापूर धरण ९८ टक्के भरले आहे. तसेच चणकापूर ८९ टक्के भरले आहे.
वरुणराजाची कृपादृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 1:57 AM