सटाणा : विद्यार्थ्यांनी निश्चय करून आत्मविश्वास वाढविला पाहिजे व आपल्या मोठेपणाचा फायदा समाजाला करून दिला पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने उत्तम माणूस बनविण्याचे शिक्षणाचे ध्येय साध्य होऊ शकेल, असे प्रतिपादन नांदेत येथील स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी केले.येथील महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत पदवीदान कार्यक्र माचे उद्घाटन डॉ. विद्यासागर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी मविप्र समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, तर विशेष अतिथी म्हणून मविप्र समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार उपस्थित होत्या. प्रास्ताविक प्राचार्य डॉ . दिलीप धोंडगे यांनी केले. या कार्यक्र मात मविप्र समाज संस्थेतील एकूण सहा महाविद्यालयातील विद्यार्थी पदवीग्रहण कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. मविप्र समाज संस्थेचे उपसभापती राघो आहिरे, संचालक डॉ. प्रशांत देवरे, सटाणा वरिष्ठ महाविद्यालय स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामचंद्र पाटील उपस्थित होते. प्रा. सुनीता शेवाळे यांनी सूत्रसंचालन केले.
सटाणा महाविद्यालयात पदवीदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 11:53 PM