नाशिक : धान्य बँक हा उपक्रम आता लवकरच नाशिकमध्येदेखील सुरू होणार आहे. या संदर्भातील महिलाची पहिली बैठक शनिवारी (दि. १५) रोजी गोळे कॉलनीमधील काका गद्रे कार्यालयात संपन्न झाली. यापूर्वी ठाणे व पुणे येथे अनेक गृहिणींनी एकत्र येऊन गेल्या तीन वर्षापासून ‘धान्यबँक’ सुरू केली आहे. आता नाशिकमध्येदेखील या उपक्रमाला सुरूवात होणार आहे. आतापर्यंत या गृहिणींनी धान्य बँकेच्या अंर्तगत २६ हजार किलोच्यावर अन्नदान केले आहे. अशा प्रकारच्या अन्नदानासाठी या गृहिणींना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. ही धान्य बँक देशभर पोहोचावी हाच या उपक्रमाचा उद्देश आहे असे उज्ज्वला बागवाडे आणि मनिषा सूर्यवंशी यांनी सांगितले.अनेक शाळा, बालिकाश्रम, वृद्धाश्रम, आधाराश्रम यांसारख्या वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना मोठ्या प्रमाणात धान्याची गरज असते. अशा संस्थांना मदत करण्याच्या हेतुने मूळच्या नाशिकच्या आणि लग्नानंतर ठाणे शहरात स्थायिक झालेल्या उज्ज्वला बागवाडे यांनी अनेक गृहिणींना एकत्र घेऊन ‘धान्य बँके’ला सुरूवात केली.
नाशिकमध्ये राबविणार ‘धान्य बँक’ उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 12:13 AM