नाशिक : मोहिनीदेवी रुंग्टा शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एकत्रित निधी गोळा करून शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना धान्य वाटप केले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एकत्रित धान्य खरेदी करून त्याचे विद्यार्थ्यांच्या गरजेप्रमाणे पाकिटे तयार करण्यात आली. यामध्ये पाच किलो गहू, दोन किलो तांदूळ, दोन किलो साखर, एक किलो तूरडाळ, एक किलो गोडेतेल, पाव किलो चहा पावडर, मिरची पावडर व हळद असे धान्याची पाकिटे तयार करून फुलेनगर, क्रांतीनगर, रामवाडी, हनुमानवाडी, मोरे मळा, लोणार गल्ली, रविवार कारंजा, मल्हारखाण, अशोकस्तंभ, कुंभारवाडा व गंजमाळ या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना शालेय समितीचे अध्यक्ष शरद जाधव, मुख्याध्यापक लता अंडे, संस्थेच्या माजी कोषाध्यक्ष वैशाली गोसावी, केशव सूर्यवंशी, मनीषा मानकर, हरिष गवळी, कैलास एकलारे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी धान्य वाटप करताना सर्वांनी आपसात सुरक्षित अंतराच्या नियमांचे पालन केले.
रुंग्टा शाळेकडून गरजू विद्यार्थ्यांना धान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 10:24 PM