खडकी : ग्रामीण भागातील ग्रामस्थांना ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध लागले आहे. ग्रामपंचायतीची मुदत संपल्याने नवीन निवडणुका पुढील महिना, दोन महिन्यात होणार असल्याने इच्छुकांनी आपली तयारी सुरू केली आहे, मात्र थेट सरपंच निवडणूक रद्द झाल्याने अनेकांनी त्याचा धसका घेतल्याचे चित्र सर्वत्र निर्माण झाले आहे.जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतीची मुदत संपत आली आहे. त्याचप्रमाणे मालेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहे. गत पाच वर्षांपूर्वी मुदतीच्या चार महिने अगोदरच निवडणुका घेण्यात आल्या होत्या. त्यादृष्टीने वॉर्डनिहाय राखीव जागाही जाहीर करण्यात आल्या आहे. प्रतीक्षा मात्र सरपंच आरक्षणाच्या तारखेचीच आहे. ग्रामविकासाच्या जुन्या काळातील योजना त्याचप्रमाणे गल्लीबोळात मुरूम, माती, कॉँक्रिटीकरणाचे काम धडाक्याने सुरू करून आपला ठसा उमटविण्यासाठी साऱ्यांचेच प्रयत्न सुरू झाले आहेत. घरकुलांचेही काम जोरात सुरू झाले आहे.तरुण मंडळीही राजकारणात सक्रिय होण्याच्या तयारीत आहे, मात्र ध्यास कसला काय याचा नेमका अंदाज घेणे कठीण आहे. ग्रामपंचायत निवडणूक आली की तळीरामांचा मोठा उत्सव असतो. आर्थिक लाभाचे प्रलोभन व आपल्या कुशलतेचा सर्वंकष प्रयत्न करणारी जुनी मंडळी आपले रंग दाखविणार आहेत.नवस, जावळ, शेंडी आदी कार्यक्रम पुढील दिवसात विनामुहूर्त साजरे केले जाणार आहे. याबाबत शंका-कुशंका घेण्याचे कारण शोधणे महत्त्वपूर्ण आहे.बैठकींना प्रारंभगल्ली-बोळात, चौकाचौकात मतदारांचा निवडणुकीसाठी गप्पांचा फड रंगत आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी क्लृप्त्या लढविल्या जात आहेत. वाडा, नातेवाईक, भाऊबंदकी यांच्या बैठका करूनच उमेदवारी ठरेल असे मतदार बोलून दाखवित आहे. निवडणुकीच्या गप्पांना मोठ्या प्रमाणात सहकार्य करून ग्रामीण भागात उत्साह दिसत आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 10:27 PM
ग्रामीण भागातील ग्रामस्थांना ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध लागले आहे. ग्रामपंचायतीची मुदत संपल्याने नवीन निवडणुका पुढील महिना, दोन महिन्यात होणार असल्याने इच्छुकांनी आपली तयारी सुरू केली आहे, मात्र थेट सरपंच निवडणूक रद्द झाल्याने अनेकांनी त्याचा धसका घेतल्याचे चित्र सर्वत्र निर्माण झाले आहे.
ठळक मुद्देखडकी : इच्छुक उमेदवारांकडून निवडणुकीची तयारी सुरू