नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील होत असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रचाराला सुरूवात झाली असून या निवडणूक प्रचाराचा नारळ नांदूरवैद्य गावचे ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ मंदिर सभागृहात ग्रामपंचायत सदस्यपदासाठी रिंगणात उतरलेल्या उमेदवारांकडून ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत वाढविण्यात आला.ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण गावागावात तापू लागले आहे. नशीब अजमावण्यासाठी व सरपंच, सदस्यपद मिळविण्यासाठी उमेदवारांनी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सध्या प्रचाराचा नारळ फुटला असून भेटीगाठींना वेग आल्याचे चिञ पहावयास मिळत आहे. निवडणुकीसाठी आरक्षण जाहिर होताच गावागावात नियोजन सुरू झाले होते. कोणता पॅनल टाकायचा? कोणता उमेदवार उभा करायचा? या संदर्भात बैठका घेऊन उमेदवार निश्चित करण्यात आले होते. दरम्यान अर्ज मागे घेतल्यानंतर उमेदवार स्पष्ट झाले. त्यानंतर भेटीगाठींना वेग आला. अनेक गावांमध्ये सध्या नारळ फुटला असून प्रचाराला वेग येत आहे. उमेदवारासह कार्यकर्ते देखील प्रचार करतांना पहावयास मिळत आहे. दिवसेंदिवस प्रचाराला उमेदवार गती देतांना दिसून येत असून मतदारांमध्येही मतदानाची उत्सुकता पहावयास मिळत आहे. निवडणुकीची कुठलीही माहिती नसतांना या प्रचारफेरीमध्ये लहान लहान मुले देखील पञके वाटतांना आनंद घेत आहेत. नांदूरवैद्य व बेलगाव या दोन्हीही गावातील उमेदवारांचा प्रचार जोरदार सुरु असून मतदान रविवारी (दि.२४) रोजी होणार असून या निवडणुकीचा निकाल दुसऱ्याच दिवशी सोमवारी (दि.२५) रोजी इगतपुरी येथील नवीन शासकीय इमारतीत होणार आहे. या दिवशी रंगपंचमी असल्याने कोणाच्या अंगावर गुलाल पडणार हे पाहण्यासाठी नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहचणार आहे. निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून पुर्ण तयारी झाली आहे. तसेच सर्व यंत्रसामुग्रीची देखील जुळवाजुळव केली आहे. गावातील सर्व उमेदवारांनी प्रचाराचा नारळ वाढविल्यानंतर संपुर्ण गावातुन प्रचारफेरी काढली. या प्रचारफेरीला ग्रामस्थांचार् प्रतिसाद लाभला आहे.
ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराचा फुटला नारळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 7:45 PM
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील होत असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रचाराला सुरूवात झाली असून या निवडणूक प्रचाराचा नारळ नांदूरवैद्य गावचे ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ मंदिर सभागृहात ग्रामपंचायत सदस्यपदासाठी रिंगणात उतरलेल्या उमेदवारांकडून ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत वाढविण्यात आला.
ठळक मुद्देइगतपुरी : रविवारी मतदान; दुसऱ्याच दिवशी मतमोजणी