शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जात वैधतेची सक्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 1:27 AM

राज्य निवडणूक आयोगाने मार्च, एप्रिल महिन्यात मुदत संपणाºया राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असून, यात मुदत संपणाºया ग्रामपंचायतींबरोबरच अनेक कारणांमुळे रिक्त झालेल्या पदांसाठी पोटनिवडणुकाही घेण्यात येणार आहे. मात्र या निवडणुकीत पहिल्यांदाच नामांकन दाखल करणाºया उमेदवारांना निवडणुकीचा अर्ज दाखल करतानाच जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सोबत जोडण्याची सक्ती करण्यात आल्याने या जात पडताळणीअभावी निवडणुकीला कितपत प्रतिसाद मिळेल, याविषयी खुद्द शासकीय यंत्रणा साशंकता व्यक्त करीत आहे.

नाशिक : राज्य निवडणूक आयोगाने मार्च, एप्रिल महिन्यात मुदत संपणाºया राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असून, यात मुदत संपणाºया ग्रामपंचायतींबरोबरच अनेक कारणांमुळे रिक्त झालेल्या पदांसाठी पोटनिवडणुकाही घेण्यात येणार आहे. मात्र या निवडणुकीत पहिल्यांदाच नामांकन दाखल करणाºया उमेदवारांना निवडणुकीचा अर्ज दाखल करतानाच जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सोबत जोडण्याची सक्ती करण्यात आल्याने या जात पडताळणीअभावी निवडणुकीला कितपत प्रतिसाद मिळेल, याविषयी खुद्द शासकीय यंत्रणा साशंकता व्यक्त करीत आहे.  गुरुवार, दि. २५ रोजी तहसीलदारांनी या निवडणुकीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली असून, आयोगाच्या आदेशानुसार दि. ५ ते १० फेब्रुवारी दरम्यान या निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. १२ फेब्रुवारी रोजी अर्जांची छाननी करण्यात येणार असून, १५ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्याचदिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप केले जाईल. २५ फेब्रुवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे. दुसºयाच दिवशी निवडणुकीची मतमोजणी करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्णातील इगतपुरी तालुक्यातील टाके घोटी या ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होणार असून, अन्य २८० ग्रामपंचायतींच्या ३९२ प्रभागातील ४९३ रिक्त जागांवर पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे.राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आपल्या पूर्वीच्याच निर्णयात बदल केला असून, ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव जागेवर विजयी झालेल्या उमेदवारांचे जात वैधता प्रमाणपत्राची सहा महिन्यांत पडताळणी करणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यासाठी उमेदवाराला नामांकन अर्ज सादर करतानाच, जात वैधता प्रमाणपत्रासाठी सक्षम अधिकाºयाकडे कागदपत्रे सादर केल्याचा पुरावा म्हणून पावती जोडावी लागत होती.  परंतु सहा महिने उलटूनही पडताळण्या समित्यांकडून वैधता होत नसल्याने अनेक उमेदवारांचे सदस्यत्वपद रद्द केले जाण्याच्या घटना घडल्या आहेत. त्या रोखण्यासाठी आता राखीव जागांवर उमेदवारी करणाºया उमेदवाराने नामांकन दाखल करताना जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची सक्ती केली आहे. त्यामुळे उमेदवारांना निवडणुकीपूर्वीच पडताळणी करून घ्यावी लागणार आहे. राज्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये विशेषत: आदिवासी भागातील ग्रामपंचायतींमध्ये निव्वळ जात वैधतेमुळेच अनेक जागा रिक्त राहण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. आता पुन्हा आयोगाने त्याचाच कित्ता गिरविल्याने रिक्त जागांवर उमेदवार मिळण्याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे.जिल्ह्यात निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे जिल्ह्यातील २८० ग्रामपंचायतींच्या ४९३ जागांसाठी निवडणूक होणार असल्याने त्या त्या ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात सोमवारपासून निवडणूक आचारसंहिता जारी करण्यात आली असून, मतदारांवर थेट प्रभाव टाकणाºया कोणत्याही घोेषणा, आश्वासनांवर बंदी घालण्यात आली आहे. निवडणूक होणाºया ग्रामपंचायतींची संख्या व (कंसात) रिक्त जागा पुढीलप्रमाणे- नाशिक- १७ (२५), पेठ- ९ (१०), त्र्यंबकेश्वर- १६ (२९), दिंडोरी- ३७ (७४), इगतपुरी- १७ (२९), निफाड- १९ (२७), सिन्नर- १० (१४), येवला- १० (१०), मालेगाव- ३४ (६९), नांदगाव- ८ (१०), चांदवड- १४ (४६), कळवण- २५ (४२), बागलाण- ४९ (९१), सुरगाणा- ४ (४), देवळा- ११ (१३)

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयElectionनिवडणूक