सौदाणे गाव मागील एक वर्षांपासून कोरोना महामारीशी लढा देत आहे सुरुवातीच्या काळात खूप काळजी घेऊन गावातील रुग्णसंख्या आटोक्यात ठेवली होती. मात्र दुसऱ्या लाटेत गावातील रुग्णसंख्या वाढली. काही लोकांचा मृत्यू झाला. बरेच रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर देखील असे बाधित बरेच दिवस उपचार न करता घरी राहिले. जेव्हा उपचारासाठी कोविड सेंटरमध्ये दाखल झाले तेव्हा त्यांचा एचआरसीटी स्कोर जास्त होता. दवाखान्यात उपचार करायचे की विलगीकरणात राहून उपचार करायचे याचा विचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे सौंदाणे ग्रामपंचायतीने बाधितांचा एचआरसीटी स्कॅन करण्याचा निर्णय घेतला. त्याचा लागणारा खर्च ग्रामपंचायतीने उचलावा, असा ठराव करण्यात आला. जेणेकरून रुग्णांना लवकर दाखल करून उपचार करणे सोपे जाईल. पुढील जे धोके टळतील. आपण आपल्या प्रियजनांना सुरक्षित ठेवू शकू.
यासाठी लागणारा खर्च सरपंच सहायता निधीतून केला जाईल. या निधीसाठी सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी त्यांचे सर्व वर्षभराचे वेतन दिले आहे तसेच गावातील काही दानशूर आर्थिक मदत करीत आहेत, असे शेवटी पत्रकात म्हटले आहे.