वाडीव-हे : इगतपुरी तालुका साहित्य मंडळ आयोजित २२ वे ग्रामीण साहित्य संमेलन २६ आणि २७ फेब्रुवारी २०२१ रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती साहित्य मंडळाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक पुंजाजी मालुंजकर यांनी दिली. दोनदिवसीय साहित्य संमेलन इगतपुरीच्या कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयात होणार आहे. यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, काव्य स्पर्धा घेण्यात येणार आहे. संमेलनात ग्रंथदिंडी, उद्घाटन सोहळा, पुस्तक प्रकाशन, पुरस्कार वितरण, परिसंवाद, कथाकथन, खुले कवी संमेलन असे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यापूर्वी साहित्य मंडळातर्फे विविध ठिकाणी २१ ग्रामीण संमेलनांचे यशस्वी आयोजन केलेले आहे. संमेलनात कोविडच्या सर्व नियमांचे पालन करण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष मालुंजकर यांनी दिली. याप्रसंगी के.पी.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.आर. भाबड, प्रा. देविदास गिरी, ग्रंथमित्र बाळासाहेब पलटने, विश्वस्त ॲड. ज्ञानेश्वर गुळवे, हिरामण शिंदे, दत्तात्रेय झनकर, ॲड. रतनकुमार इचम आदी मान्यवर उपस्थित होते.
इगतपुरीत २६ आणि २७ फेब्रुवारीला ग्रामीण साहित्य संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 9:16 PM
वाडीव-हे : इगतपुरी तालुका साहित्य मंडळ आयोजित २२ वे ग्रामीण साहित्य संमेलन २६ आणि २७ फेब्रुवारी २०२१ रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती साहित्य मंडळाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक पुंजाजी मालुंजकर यांनी दिली. दोनदिवसीय साहित्य संमेलन इगतपुरीच्या कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयात होणार आहे.
ठळक मुद्दे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, काव्य स्पर्धा