नाशिक : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांची बदली करण्यात यावी या मागणीसाठी ग्रामसेवक संघटनांच्या वतीने नांदगाव, कळवण आणि पेठ येथे धरणे आंदोलन करण्यात आले.कळवण : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपकुमार मीणा यांच्या कारभाराविरोधात महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेने पुकारलेल्या आंदोलनात कळवण तालुका ग्रामसेवक संघटनेतर्फे पंचायत समिती समोर धरणे आंदोलन करण्यात आले. तालुका ग्रामसेवक युनियनने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, संपूर्ण जिल्ह्यात ग्रामसेवक शासनाचे ध्येयधोरणे व नियम निकषाप्रमाणे जनतेच्या अडीअडचणी सोडविण्याचे काम इमान इतबारे करीत आहेत. मात्र गेल्या वर्षभरापासून मीणा ग्रामसेवकांविषयी मनात आकस ठेवून नकारात्मक व दडपशाही पद्धतीने कामकाज करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनाची प्रत ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे याना ई-मेलद्वारे पाठविण्यात आली. या आंदोलनात तालुकाध्यक्ष रवींद्र ठाकरे, उपाध्यक्ष भावराव ठाकरे, महिला उपाध्यक्ष मीना भोये, सचिव आर.एम. महाजन, आर.एम. जाधव, वैशाली देवरे, हेमा पवार, सुनील आहेर, कविता बेडसे, सुजाता बागुल, वंदना बागुल, विनता चौधरी, जिजाबाई चौधरी, फुला गावित, जयश्री गावित, पंडव बहिरम, भास्कर बागुल, दिगंबर भामरे, नितीन बच्छाव आदींसह ग्रामसेवक सहभागी झाले होते. पेठ : शासनाकडे असलेल्या विविध प्रलंबित मागण्यांची पूर्तता होत नसल्याने पेठ तालुका ग्रामसेवक संघटनेच्या वतीने येथील पंचायत समिती कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन केले. कंत्राटी ग्रामसेवकांना नियमित करावे, ग्रामविकास अधिकारी व विस्तार अधिकारीपदी पदोन्नती द्यावी, निलंबित ग्रामसेवकांना पदस्थापना द्यावी, पात्र कर्मचाºयांचे स्थायित्व मंजूर करावे, आदर्श ग्रामसेवक पुरस्कारांचे वितरण करावे, गटविकास अधिकारी यांना दिलेले निलंबनाचे अधिकार रद्द करावेत आदी मागण्यांसाठी एक दिवसाचे धरणे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी विविध कर्मचारी व अधिकारी संघटनांनी या आंदोलनास पाठिंबा दिला. जि.प. सदस्य भास्कर गावित, हेमलता गावित, सभापती पुष्पा गवळी, उपसभापती तुळशिराम वाघमारे, विलास अलबाड, पुष्पा पवार आदिंनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. याप्रसंगी ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष बी.आर. खंबाईत, सचिव आर.एम. मगर, उपाध्यक्ष पी.आर. गायकवाड, पी.ए. सुरसे, डी.एस. जाधव, एन.के. चौधरी, डी.बी. गायकवाड, के.बी. भानशी, विस्तार अधिकारी बी.एस. पवार यांच्यासह ग्रामसेवक उपस्थित होते.नांदगाव : राज्य ग्रामसेवक युनियनच्या नांदगाव शाखेने तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. तहसीलदार चंद्रकांत देवगुणे यांना या संदर्भात निवेदन दिले. गेल्या वीस वर्षात ग्रामसेवक संघटनेचे प्रशासनाबरोबर चांगले संबंध असल्याचा दाखला देऊन, सध्या कार्यरत असलेले मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यपद्धतीमुळे कामावर विपरीत परिणाम होत असल्याची तक्र ार ग्रामसेवक संघटनेने निवेदनात केली आहे. संघटनेचे जिल्हा सचिव रवींद्र शेलार यांनी आंदोलन सुरू असले तरी जनतेची गाव पातळीवरील सर्व कामे करण्यात येतील. मात्र संघटनेचे सदस्य वरिष्ठांना अहवाल देणार नाहीत. निवेदनात एकूण १४ प्रलंबित समस्या मांडण्यात आल्या आहेत. त्यात सेवा नियमित करणे, पदोन्नती, निलंबिताचे पुनर्स्थापन, विहित कालावधीत निर्णय, ग्रामसेवक पुरस्कार, परिविक्षाधीन कालावधी संपवणे, गटविकास अधिकारी यांना दिलेले निलंबनाचे अधिकार रद्द करणे, विनाचौकशी निलंबन न करणे अशा मागण्या करण्यात आलेल्या आहेत. गोंदूर धुळे येथील एस.बी. वाघ या ग्रामसेवकाच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्यांना कठोर शासन व्हावे, अशी मागणी दुसºया निवेदनात करण्यात आली आहे. राजेंद्र थोरात, अतुल सोनवणे, नीलेश पुराणिक, सरला राठोड, स्मिता गडाख, गोकुळ खैरनार, मिलिंद सोनवणे, चतुर शिरसाठ, रामदास मोरे, प्रमोद महाले, बिरू गेंद, पावन थोरात, रवींद्र शेलार, भगवान जाधव, संजय सैंदाणे, युवराज निकम, पावन वाघ, अतुल आहिरे, बबन राठोड, संजय फलके, प्रवीण सांगळे आदींनी आंदोलनात सहभागी झाले होते.
ग्रामसेवक संघटना आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:28 AM