ताहाराबाद : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ग्रामपंचायतीच्या बहुचर्चित भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून तत्कालीन ग्रामसेवक स्वप्निल पांडुरंग ठोके यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, त्यांच्यावर खातेनिहाय चौकशीचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिले आहेत.गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ग्रामपंचायत १४ वा वित्त आयोग,१५ वा वित्त आयोग, ग्रामनिधी यासह अनेक भ्रष्टाचाराच्या मुद्यावर सर्व जिल्ह्यांत चर्चेत होती. याप्रकरणी चौकशीसाठी समिती नियुक्त करण्यात आली होती.त्यानुसार ग्रामसेवक ठोके यांनी शासकीय कर्तव्यात कसूर करणे आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद, जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ चे नियम ३ चा भंग केल्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी ठोके यांच्यावर निलंबनाची कारवाई केली असून, ताहाराबाद ग्रामपंचायतीची संपूर्ण दप्तर तपासणी करून त्या अनुषंगाने त्यांची खाते चौकशी सुरू करण्यासाठी ७ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ताहाराबाद ग्रामपंचायतीच्या वरील सर्व भ्रष्टाचाराला जबाबदार असलेल्या तत्कालीन ग्रामसेवक ठोके यांना सेवेतून बडतर्फ करून, भ्रष्टाचार केलेली सर्व रक्कम त्यांच्याकडून वसूल करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.अनेक कारनामे समोरताहाराबाद ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक स्वप्निल ठोके यांनी आपल्या कारकीर्दीत ग्रामपंचायतीत केलेले अनेक प्रताप समोर आले आहेत. ताहाराबाद ग्रामपंचायतीच्या हद्दीतील जुने बसस्थानक ते अंतापूर चौफुली येथील ग्रामपंचायत मालकीच्या जागेवर मासिक सभा / ग्रामसभा ठराव न करता परस्पर जागा वाटप करणे व करारनामा करताना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांची पूर्व परवानगी न घेणे, नमुना नंबर ७ पावतीवर गाळा भाडे वसुली नोंद करून प्रशासनाची दिशाभूल करणे, १४ वित्त आयोगातून सन २०१९, २०२० व २०२१ या वर्षात कामाचे तुकडे पाडून कामे करणे, दरपत्रक न घेता साहित्य खरेदी करणे, साठा रजिस्टर नोंद न घेणे आदी मुद्यावर ग्रामसेवक स्वप्निल ठोके यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
ग्रामसेवक स्वप्निल ठोके अखेर निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2022 12:06 AM
ताहाराबाद : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ग्रामपंचायतीच्या बहुचर्चित भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून तत्कालीन ग्रामसेवक स्वप्निल पांडुरंग ठोके यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात ...
ठळक मुद्देताहाराबाद : भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून कारवाई