कसा असेल शिवस्मारक प्रकल्प ...
शंभर एकर परिसरात उंच प्रशस्त चौथऱ्यावर छत्रपती शिवरायांचा ब्रांझ धातूचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येईल. त्यांच्या जीवनावर महती, पोहोचविण्यासाठी शिवसृष्टी निर्माण केली जाणार आहे. शिवरायांच्या जीवनातील एतिहासिक घटनांचे म्युरलस उभारण्यात येऊन एतिहासिक घटनांचे पेंटिंग रेखाटण्यात येणार आहे. म्युझियमचे बांधकाम केले जाणार आहे. ५० व्यक्ती बसू शकतील, अशा अक्षमतेचे लहान चित्रपटगृह उभारून महाराजांवरील जीवनपट दाखविले जाणार आहेत. किल्ल्याच्या तटबंदीप्रमाणे दगडी संरक्षण भिंत, किल्ल्याच्या दरवाजप्रमाणे भव्य प्रवेशद्वार, अर्धवर्तुळाकार बुरुज व चौकीदार कक्ष बांधण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील प्रसिद्ध किल्ल्यांच्या प्रतिकृती संग्रहालयही निर्माण करण्यात येणार आहे. साल्हेर परिसरातील गुजरातकडे वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी बंधारे बांधून तलाव निर्माण करणे व त्यात पर्यटकांसाठी बोटिंगची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. गुजरातकडील खोल दरीच्या बाजूस कठडे बांधून व्ह्यू पॉइंटची निर्मिती केली जाणार आहे.
फोटो कॅप्शन; शिवस्मारकाच्या जागेची पाहणी करताना आमदार दिलीप बोरसे समवेत जिल्हापरिषद सदस्य यतीन पगार, किशोर भामरे, भाऊसाहेब अहिरे, बिंदुशेठ शर्मा सुरेश देवरे आदी.