- भगवान गायकवाड
दिंडोरी - तालुक्यातील नळवाडपाडा शिवारातील वस्तीवर एका बंद कंपनीच्या जुन्या खोलीत झोपलेले गुलाब वामन खरे (आजोबा) विठाबाई गुलाब खरे, निशांत विशाल खरे (नातू) रा. नळवाडी हे सदर खोलीचे छत कोसळून दाबले गेले, यात आजोबा गुलाब खरे व निशांत खरे यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर ग्रामस्थ अन प्रशासनाने वेळीच मदत कार्य राबवत आजी ला सुखरूप बाहेर काढले.
गुरुवारी पहाटे पासून तालुक्यात पाऊस सुरू असून दिंडोरी तालुक्यातील नळवाडपाडा शिवारातील इंडो फ्रेंच कंपनीच्या जुन्या काही खोल्या असून त्या शेजारी गुलाब वामन खरे यांचे घर आहे खरे हे रात्री नेहमी सदर खोलीत पत्नी व नातू समवेत राहत होते. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास तिघे झोपलेले असताना अचानक सदर खोलीचे छत कोसळत त्याखाली ते दाबले गेले, शेजारी त्यांचे मुलाला आवाज येताच त्यांनी तेथे बघितले असता त्यांना आई वडील मुलगा छता खाली दाबल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने सरपंच हिरामण गावित व ग्रामस्थांना कळवले सरपंच यांनी तातडीने सर्कल तलाठी यांना कळवत मदत मागवली.
जेसीबी आणणार आले. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले पहाटे चारच्या सुमारास सरपंच हिरामण गावित, शिपाई बाळू गवळी व ग्रामस्थांनी आत जात तिघांना बाहेर काढले. त्यात आजोबा व नातू मयत झाले होते तर जखमी आजी विठाबाई यांना सुखरूप बाहेर काढत त्यांना दवाखान्यात नेले. सर्कल अमोल ढमके, तलाठी गिरीश बोंबले, ग्रामसेविका ललिता खांडवी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेटली. ग्रामस्थांनी पावसात मदतकार्य करत आजीचे प्राण वाचवले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.