शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

हरिहर गड सर करणाऱ्या आजींची कोरोनावरही मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2021 1:23 AM

गिर्यारोहकांना आव्हानात्मक असते, तेथे वयाच्या सत्तरीतही उमेद आणि जिद्दीने हा गड सहज सर करणाऱ्या आशाबाई आंबाडे गेल्यावर्षी सोशल मीडियावर देशभरात व्हायरल झाल्या हाेत्या. त्याच आजींना यंदा कोरोनाने गाठले खरे; परंतु दुर्दम्य इच्छाशक्ती, सकारात्मक विचार आणि योगासने, प्राणायम यावर विश्वास यामुळे त्यांनी कोरोनावर मात केली. केवळ त्यांनीच नव्हे तर त्यांची दोन मुले, सुना, नातवंडे अशा एकूण नऊ जणांनाही कोरोनाने घेरले. मात्र, त्यांनीची योग्य उपचार आणि सकारात्मक विचारांमुळे सर्व कुटुंबाने त्यावर मात केली.

ठळक मुद्देसकारात्मक विचार अन् योगासने प्राणायामाचा अनुकूल परिणाम

नाशिक : गिर्यारोहकांना आव्हानात्मक असते, तेथे वयाच्या सत्तरीतही उमेद आणि जिद्दीने हा गड सहज सर करणाऱ्या आशाबाई आंबाडे गेल्यावर्षी सोशल मीडियावर देशभरात व्हायरल झाल्या हाेत्या. त्याच आजींना यंदा कोरोनाने गाठले खरे; परंतु दुर्दम्य इच्छाशक्ती, सकारात्मक विचार आणि योगासने, प्राणायम यावर विश्वास यामुळे त्यांनी कोरोनावर मात केली. केवळ त्यांनीच नव्हे तर त्यांची दोन मुले, सुना, नातवंडे अशा एकूण नऊ जणांनाही कोरोनाने घेरले. मात्र, त्यांनीची योग्य उपचार आणि सकारात्मक विचारांमुळे सर्व कुटुंबाने त्यावर मात केली.कोरोना संसर्ग झाल्यानंतर अनेकांना भीती वाटते आणि त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर अधिकच परिणाम होतो. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना कोरोना संसर्ग झाला तरी धक्का बसतो; परंतु  आशा आंबाडे यांनी मात्र आपल्यावरील या  संकटाला न घाबरता तोंड दिले. गेल्या २० मार्च रोजी खरे तर त्यांनी कोराेना प्रतिबंधकात्मक लस घेतली आणि त्यानंतर त्यांना ताप आला.सुरुवातीला लसीचा डाेस घेतल्याने साईडइफेक्ट असतील म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्यांनी उपचारासाठी गोळ्या घेतल्या. मात्र, ताप उतरत नाही हे बघितल्यानंतर मात्र कुटुंबीयांना शंका आली. त्यामुळे त्यांनी कोराेना चाचणी केली. त्यात त्या पॉझिटिव्ह निघाल्या; पण डगमगल्या नाहीत. त्यानुसार कुटुंबीयांनी लक्ष ठेवले जेव्हा ऑक्सिजन लेव्हल ८८ झाली. तेव्हा मात्र कुटुंबीयांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे दोन दिवस ऑक्सिजनवर ठेवावे लागले; परंतु नंतर ऑक्सिजनची लेव्हल वाढली आणि त्यांना लगेचच पाचव्या दिवशी डिस्चार्च मिळाला; परंतु यादरम्यान त्यांचे धाकटे चिरंजीव संजय हे पॉझिटिव्ह झाले.त्यांच्यापाठोपाठ थोरले बंधू ॲड. मनोज आंबाडे हे पॉझिटिव्ह आले. त्यानंतर संजय यांंच्या पत्नी सुजाता आणि मृण्मयी व मृगांश ही दोन मुले तसेच मनोज यांच्या पत्नी तनुजा तसेच  वेदिका आणि वेदांत ही दोन अपत्ये  असे सर्वच जण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले; परंतु सर्वांनीच भीतीने घाबरून न जाता कोरोनावर निश्चित मात करू, अशीच जिद्द बाळगली आणि सर्वच कुटुंब कोरोनामुक्त झाले

७० वर्षीय आजी देशभरात आल्या होत्या चर्चेतगेल्या वर्षी कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात सर्व आंबाडे कुटुंबीय सहलीसाठी हरिहर गड येथे गेले. त्यावेळी आशाबाई या  गड चढतील, असे कोणाला वाटलेे नव्हते. मात्र, त्यांनीही गड चढण्याची तयारी दर्शवली आणि कुटुंबीयांनी साथ दिली. त्यासंदर्भातील व्हिडिओ देशभरात अनेक माध्यमांत व्हायरल झाला. आंबाडे कुटुंबीय अलीबाग येथील असून नाशिकमध्ये सुमारे पन्नास वर्षांपासून स्थायिक आहेत.  दुगाव येथे  त्यांची शेती असून  आशाबाई १९९५-९६ पासून शेतीत काम करतात. आता वयामुळे त्या तेथे जात नसल्या तरी घरातही सतत काही ना काही कामात व्यस्त असतात. योगगुरू रामदेव बाबा यांच्या प्रेरणेने त्या पंधरा ते वीस आसने आणि प्राणायम नियमित करतात. मुलांना आणि विशेष करून नातंवडांना आसने शिकवून त्या करवून घेतात. एकत्रित कुटुंब आणि तेथील सकारात्मक वातावरण ही मोठी ऊर्जा असल्याचे आशाबाई सांगतात..

टॅग्स :NashikनाशिकCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या