विद्यमान आमदार दिलीप बनकर आणि त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले माजी आमदार अनिल कदम हे तालुक्यातील कोविड बाधितांच्या आरोग्यहितासाठी मदतीला धावून जात असल्याने तालुक्यात या कट्टर प्रतिस्पर्ध्यांची चर्चा न झाली तर नवलच.
राजकीय पटलावर कमालीचे हुशारपण राखण्यात माहीर असलेले लाखो मतदार ही या तालुक्याची खरी ओळख आहे.परंतु कोरोनाकाळात होरपळून निघत असलेल्या सामान्य माणसाला तितकाच धीर देण्याचा प्रयत्न मात्र कौतुकास पात्र ठरताना दिसत आहे. दिलीप बनकर यांनी तालुक्यातील दौऱ्याबरोबरच पिंपळगाव येथील भीमाशंकर संस्थेत कोविड सेंटर केले आहे. तेथे ठाण मांडून ते आपल्या उद्योजक व सहकार धुरिणांच्या मदतीने सेल्फ मॅनेजमेंट करत आहेत. दुसरीकडे वैद्यकीय क्षेत्राच्या अनुभवातून राजकारणात पदार्पण केलेल्या अनिल कदम हे मात्र गावोगावी जाऊन बेड मॅनेजमेंट करत स्वतःच ॲम्ब्युलन्सचे सारथी होताना दिसत आहे. हातात एक ऑक्सिमीटर, ग्लोव्हज, मास्क आणि सोबतीला चार जोडीदार असा लवाजमा घेत त्यांनीदेखील जंग जंग पछाडले आहे. जेथे परिवारातील सदस्य बाधित पार्थिवाला हात लावण्यास धजवतात तेथे स्वतः कदम ते काम करत आहेत.
इन्फो
सकारात्मक ऊर्जा
खरे तर सद्य:स्थितीत तालुक्यात कोणत्याही निवडणुका नसताना सुरू झालेला आरोग्य सुदृढतेचा हा वसा कमालीचा चर्चिला जात आहे. या दोघांभोवती अख्ख्या तालुक्याचे राजकारण फिरत असताना सध्या त्यांनी हातात हात घालून सुरू केलेले काम सकारात्मक ऊर्जा देणारे ठरत आहे.
फोटो - ०८ निफाड आमदार
०८ निफाड कदम
===Photopath===
080521\08nsk_14_08052021_13.jpg~080521\08nsk_17_08052021_13.jpg
===Caption===
फोटो - ०८ निफाड आमदार~०८ निफाड कदम