नाशिक : दोन दिवसांपुर्वी सातपूर पोलीस ठाणे हद्दीत फाशीच्या डोंगरालगत एका खड्डयात आमदार हिरामण खोसकर यांचे चुलते रामदास गोपाळा खोसकर यांचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी सातपूर पोलिसांनी संशयितांविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी या गुन्ह्यात तीघा संशयित नातवंडांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना येत्या शनिवारपर्यंत (दि.८) पोलीस कोठडी सुनावली.सातपूर पोलिसांच्या हद्दीत शुक्रवारी (दि.३१) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास फाशीच्या डोंगराजवळ रामदास गोपाळा खोसकर या वयोवृध्द व्यक्तीचा मृतदेह बेवारसस्थितीत पोलिसांना आढळून आला. याप्रकरणी पोलीस उपनिरिक्षक शांतीलाल चव्हाण यांनी सातपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मयताच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्याराचे घाव आढळून आल्याने खूनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपासाला गती दिली. दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरिक्षक राकेश हांडे यांनी संशयावरून या गुन्ह्यात मयत रामदास यांचे नातू अंकुश सुभाष खोसकर, लक्ष्मण प्रभाकर खोसकर, सुखदेव खोसकर या तीघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या तीघांनी नात्याने आजोबा लागणारे रामदास यांचा खून का केला? कोठे केला? गुन्ह्यात कोणत्या शस्त्रांचा वापर केला? याचा तपास पोलीस कोठडीत संश्यितांची चौकशीदरम्यान केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. गुन्हा कोठे घडला याचाही उलगडा अद्याप झालेला नाही. केवळ सातपूर पोलिसांच्या हद्दीत रामदास यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यानुसार पोलिसांनी गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे.इगतपुरी मतदारसंघाचे आमदार असलेले हिरामण खोसकर यांचे गिरणारे गावापासून पुढे काही अंतरावर नाईकवाडी हे गाव आहे. त्यांचे भाऊबंदपैकी एका चुलत्याचा खून झाल्याचे उघडकीस आले. तसेच दुसरा भाऊ काशिनाथ खोसकर हेदेखील मागील पाच दिवसांपासून बेपत्ता झाले आहेत. वयोवृध्द खोसकर बंधूंपैकी एकाचा खून झाला तर दुसरा अजूनही बेपत्ता असून तालुका पोलीस ठाण्यात त्यांची बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. या दोन घटनांमुळे नाईकवाडी पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली आहे. ज्यांचा खून झाला ते रामदास हे बेपत्ता असलेले काशिनाथ यांचे मोठे बंधू होत. मयत खोसकर यांच्या पश्चात मुलगा, तीन मुली, भाऊ असा परिवार आहे.
आमदार खोसकर यांच्या चुलत्याच्या खूनप्रकरणी नातवंडांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2020 6:48 PM
सातपूर पोलिसांच्या हद्दीत शुक्रवारी (दि.३१) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास फाशीच्या डोंगराजवळ रामदास गोपाळा खोसकर या वयोवृध्द व्यक्तीचा मृतदेह बेवारसस्थितीत पोलिसांना आढळून आला.
ठळक मुद्देमृतदेह बेवारसस्थितीत पोलिसांना आढळून आलादुसरा भाऊ काशिनाथ खोसकर हेदेखील पाच दिवसांपासून बेपत्तायेत्या शनिवारपर्यंत (दि.८) पोलीस कोठडी सुनावली.