सटाणा : नाशिक जिल्ह्यातील निर्यातक्षम द्राक्ष उत्पादित करणाºया पस्तीस शेतकऱ्यांना चांदवड तालुक्यातील बहाद्दुरी येथील दोघा निर्यातदार शिरसाठ बंधू एक कोटी नव्वद लाख रूपयांना गंडा घालून पसार झाल्याने खळबळ उडाली आहे.याप्रकरणी फसवणूक झालेल्या शेतक-यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्र ार केली आहे. बागलाण तालुक्यातील बिजोटे व चांदवड तालुक्यातील वडाळीभोई ,कुंडाणे , धोडंबे ,मालसाने ,शिंदे येथील सुमारे पस्तीस द्राक्ष उत्पादक शेतकर्यांकडून बहाद्दुरी येथील योगेश रामकृष्ण शिरसाठ ,नवनाथ रामकृष्ण शिरसाठ या दोघा भावांनी वेळोवेळी निर्यातक्षम द्राक्ष खरेदी केले होते.कोकणगाव येथील रंगनाथ घुले ,साकोरे येथील बाळासाहेब हिरे यांच्या सहकार्याने माल घेतला होता. द्राक्ष खरेदी पोटी संबधित खरेदीदारांनी धनादेश दिले होते.परंतु दिलेल्या तारखेला धनादेश न वटल्याने शिरसाठ बंधूंकडे पैशांची मागणी केली.मात्र वेळोवेळी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांना वकिलामार्फत नोटीस बजावण्यात आली. त्याला न जुमानता तो बेपत्ता झाल्याचे तक्र ारीत नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणी फसवणूक झालेल्या शेतकºयांनी नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक आरती सिंग यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. सिंग यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्र ार देण्याच्या सूचना दिल्या असून लवकरच शेतकर्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू असे सांगितले.
द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना १ कोटी ९० लाखांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 4:28 PM